Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियांनवरील दाव्यांनुसार, पेरुच्या राजधानी लिमा येथे सुमारे ४००० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या एका तांत्रिक गटाने एक भविष्यवाणी केली होती. या तात्रिकांनी दावा केला होता की, मादुरो यांना सत्तेवरुन काढून टाकले जाईल. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) महत्त्वाची भूमिका बजावतील.
दरम्यान या भविष्यवाणीच्या पाच दिवसानंतर शनिवारी (०३ जानेवारी २०२६) अमेरिकेने कराकस येथे लष्करी कारवाई कत मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. सध्या त्यांना अमेरिकेच्या डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. आज मादुरो यांना अमेरिकेच्या फेडरल कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात येणार आहे. मादुरो यांच्यावर, ड्रग्ज तस्करीचा, दहशतवादी संघटनांना मदत केल्याचा आणि दक्षिण अमेरिकेमधून अमेरिकेत तस्करीचे जाळे उभारल्याचा आरोप केला आहे.
सोशल मीडियावरली दाव्यांनुसार, २९ डिसेंबर २०२५ रोजी मादुरो यांच्या अटकेची भविष्यवाणी करण्यात आली होती. पेरुच्या लिमा येथील समुद्रकिनाऱ्यावर एका तात्रिक गटाने यासाठी एक विधी केला होता. या तात्रिकांनी २०२६ मध्ये होणाऱ्या काही प्रमुख घटनांची भविष्यवाणी केली होती. यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण, युद्ध आणि काही नेत्यांवर भविष्य सांगण्यात आले होते.
दरम्यान तांत्रिक ॲना मारिया सिमियोन यांनी म्हटले होते की, मादुरो सत्ता सोडतील आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका असले. येत्या वर्षाच्या सुरुवातील हे घडले असा ॲना मारिया सिमियोनने केला होता. हे भाकित खरे झाले आहे. मादुरो आणि त्यांच्या पत्नीने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण अमेरिकेने त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अना मारिया सिमियोनच्या तांत्रिक गट दरवर्षी वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये अशा प्रकारे भविष्यवाणी करत विधी करतात. त्यांची काही भाकित खरी ठरली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये युक्रेन युद्ध समाप्तीची भविष्यवाणी करण्यात आली होती, मात्र ती चुकीची ठरली आहे. तसेच इस्रायल आणि गाझा अणुयुद्धाचा इशारा दिला होता, पण सध्या युद्धबंदी सुरु आहे.
Ans: पेरुच्या राजधानी लिमा येथील तांत्रिकांनी मादुरो यांना सत्तेवरुन काढून टाकले जाईल. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) महत्त्वाची भूमिका बजावतील अशा भविष्यवाणी केली होती.
Ans: पेरुच्या तात्रिकांची मादुरो संबंधित भविष्यवाणी खरी ठरली आहे, अमेरिकेने गुप्त कारवाई करत मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे.






