"बाबा तुम्ही लवकर बरे व्हा..." मृत्यूशी झुंज देत असलेल्या वडिलांना चिमुकलीने घातली साद; Viral Video पाहून अश्रू अनावर होतील
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी भावुक करतात तर कधी थक्क करून जातात. सध्या इथे एका बाप-लेकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृश्ये फार भावुक असून ती पाहून तुम्हाला तुमचे अश्रू अनावर होतील. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली मृत्यूशी झुंझ देत असलेल्या आपल्या वडिलांशी भावनिक संवाद घालताना दिसते. हा संवाद आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यातील दृश्ये पाहून आता अनेकांचे डोळे पाणावले आहेत. यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
बाप-लेकीचे नाते हे जगावेगळे असते. याची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही. कठोर वाटणारा हा बाप भल्याभल्यांची बोलती बंद करतो मात्र आपल्या मुलीसमोर मात्र तो पाझरतो. कोणत्याही मुलींसाठी तिचे वडील हे कोणत्या सुपरहिरोहुन कमी नाहीत. अशात आपल्या सुपरहिरोला काही झाले आहे हे समजताच तिच्या जीवाची काय घालमेल होत असेल याचा विचार करा. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक चिमुकली हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेल्या तिच्या वडिलाशी संवाद साधताना दिसते. वडील मृत्यूशी झुंज देत असतात मात्र चिमुकली त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करते.
व्हिडिओमध्ये वडिलांना काहीही बोलताना येत नसल्याचे दिसते, ते निपचित आपल्या बेडवर पडलेले असतात. अशात त्यांची मुलगी त्यांच्यासमोर येऊन उभी राहते यावेळी आपल्याला तिच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसून येतात. चिमुकली वडिलांना बरे लवकर बरे होण्याचे आवाहन करते आणि एकटक त्यांच्याकडे पाहत राहते. हे संपूर्ण दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून लोक आता हा व्हिडिओ पाहून भावुक झाले आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @mustaqeem.ahmed.31149 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी मनाने खूप कच्ची आहे, असे व्हिडीओ बघून माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत, मला पण एक लहान मुलगी आहे, ती माझी खूप काळजी घेते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “महादेव मुलीच्या वडिलांना लवकर ठीक करा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.