(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असे अनेक विचित्र व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून लोकांना काही गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण जाते. पण भाऊ, हे कलियुग आहे, इथे काहीही होऊ शकते. अशा परिस्थितीत सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, एका पत्नीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पतीच्या एक्स गर्लफ्रेंडला आमंत्रण दिले. पतीची एक्स गर्लफ्रेंड तिथे पोहोचल्यावर तिथे असे काही घडते की पाहून सर्वच हादरतात. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ स्क्रिप्टेडही असू शकतो. याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की, एका महिलेने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नवऱ्याच्या एक्स गर्लफ्रेंडला आमंत्रण केले. एक्स गर्लफ्रेंडही त्या कार्यक्रमाला हजेरी लावली. आपल्या एक्स गर्लफ्रेंडला पाहताच पती खुश होतो आणि आनंदाने तिला मिठी मारतो. पुढे काय काय होते ते सविस्तर जाणून घेऊया.
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, नवरा, बायको हार घालून उभे असतात. तेवढ्यात पतीच्या एक्स गर्लफ्रेंडची एंट्री होत. तिला पाहताच पतीचा आनंद गगनात मावत नाही आणि तो आनंदाने तिच्याकडे पाहू लागतो. नवऱ्या बायकोच्या लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला बायकोने हे पाहून नवऱ्याला आपल्या प्रेमाचे जुने दिवस आठवले आणि त्याने सर्वांसमोर आपल्या एक्स गर्लफ्रेंडला मिठी मारली आणि गुडघे टेकून तिला गुलाब देतो. विशेष म्हणजे यावेळी पत्नी हे सर्व दृश्य पाहून खुश होते आणि आनंदाने टाळ्या वाजवताना दिसते. हे संपूर्ण दृश्य आता अनेकांना कोड्यात टाकत आहे तर अनेकजण याला कलियुग असल्याचे म्हणत आहेत.
भगवान सबको ऐसी पत्नी दे..
पति की सालगिराह पर पत्नी ने बुलाई पति की गर्लफ्रेंड..👇 pic.twitter.com/xudnQgbdTO— K̳a̳p̳i̳l̳ ̳S̳h̳a̳r̳m̳a̳ ̳(̳p̳a̳r̳o̳d̳y̳)̳ (@kapil_parod) February 19, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @kapil_parod नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘देव अशी बायको सगळ्यांना देवो, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीने पतीच्या एक्सला बोलावले’ असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडिओ 3 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे, कलियुगात तुझी सतयुग बायको??” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “साक्षात देवी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.