Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

Video Viral : वि्द्यार्थ्यांवर हल्ला करणार नाही... म्हणत पोलिस अधिकाऱ्याने दिला आपल्या पदाचा राजीनामा. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्यक्तीच्या दाव्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2026 | 12:11 PM
नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, 'भावांवर गोळी झाडू शकत नाही'; Video Viral

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, 'भावांवर गोळी झाडू शकत नाही'; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
  • व्हिडिओतील दाव्यामुळे सोशल मीडियावर समर्थनासह शंका उपस्थित करणाऱ्या प्रतिक्रियांचाही पूर आला.
  • संबंधित व्यक्तीच्या दाव्याची सत्यता आणि व्हिडिओची चर्चा सध्या इंटरनेटवर केंद्रस्थानी आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवर मागील काही दिवसांपासून सीजेपीचे आंदोलन सुरु आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थी आणि देशातील अनेक भागांतून लोकांनी आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली. या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीच्या आंदोलनात करण्यात आली. २० जुलै रोजी साजेपी आणि त्यांच्या आंदोलनात सामील झालेल्या हजारोंनी संसदेपर्यंत शांततापूर्व रॅलीत सामील होण्याचा निर्णय घेतला. ही रॅली देशातील एक ऐतिहासिक रॅली म्हटली तर वावगं ठरणार नाही, रॅलीची सुरुवात होताच यात भरपूर असंतोष पाहायला मिळाला. आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला, इतकंच नाही तर यात टिअर गॅसचाही वापर करण्यात आला.

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral

पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये हजारो विद्यार्थी आणि आंदोलक जखमी झाले याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. आता याच पार्श्वभूमीवर एका पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. रॅलीत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना पोलिसांच्या लाठीचार्जवर टिका व्यक्त करण्यास सुरुवात केली. जनतेचे रक्षक म्हणून ओळखले जाणारे पोलिस विद्यार्थ्यांसाठी मात्र हैवाण झाले आहेत अशा प्रतिक्रिया यूजर्स देऊ लागले. पण अलिकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओत मात्र पोलिस अधिकाऱ्याने सर्वांचेच मन जिंकून घेतले.

व्हायरल व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, व्यक्ती दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक होता. त्यालाही जंतर मंतर येथील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश मिळाले होते, परंतु विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याऐवजी त्याने राजीनामा देणे पसंत केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच, आंदोलन करणारे विद्यार्थी आणि ‘जनरेशन-जी’ने त्या व्यक्तीचे कौतुक करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे काहींनी व्यक्तीच्या दाव्याला खोट ठरवतं तो फक्त प्रसिद्धीसाठी नाटक करत आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दिल्ली पुलिस के सब-इंस्पेक्टर मोहित ने छात्रों के समर्थन में अपना इस्तीफा दे दिया। NEET पेपर घोटाले के खिलाफ जंतर मंतर पर चल रहे छात्र आंदोलन में लाठीचार्ज के आदेश से दुखी होकर उन्होंने यह कदम उठाया। मोहित जंतर मंतर पहुंचकर बोले, “भाइयों को लाठी नहीं मार सकता।” pic.twitter.com/YNgs3D02hW — Lakhan meena (@LakhanmeenaIND) July 23, 2026

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral

हा व्हिडिओ @LakhanmeenaIND नावाच्या एक्स अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “दिल्ली पोलिसांचा नवा डावपेच: आंदोलनांमध्ये आपले खबरी घुसवण्यासाठी याला इथे पाठवलं असेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे साफ खोटं आहे. जर त्याच्यात हिंमत असेल, तर त्याने पुरावे सादर करून दाखवावेत, असं मी त्याला आव्हान देतोय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ सांभाळून ठेवा, मला खात्री आहे की दिल्ली पोलिस हा दावा खोटा ठरवेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delhi jantar mantar protest viral video police officer resigns over lathicharge claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Delhi Police
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
1

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान
2

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
3

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
4

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.