दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत! लेडीज डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरूषांना पोलिसांचा चोप; व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडिया रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा इतके मजेशीर व्हिडिओ आपण पाहतो की, हसू आवरता येत नाही. तर अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तसेच तुम्ही दिल्ली मेट्रोचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी भांडमाचे तर कधी मेट्रोत रील बनवतानाचे तर कधी कपल्सचे असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण सध्या एक दिल्ली मेट्रोच असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तुम्हाला माहितच असेल की, ट्रेन किंवा मेट्रोमध्ये महिलांसाठी राखीव डबे असतात. ज्यामध्ये फक्त महिलाच प्रवास करू शकतात. पण अनेकदा लोक हा नियम पाळत नाही. असेच काहीसे सध्या घडले आहे. काही पुरूष महिलांच्या डब्यात घुसले होते. या पुरूषांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. महिला बोगीतून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
नेमके काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही पुरूष मेट्रोतून महिला पोलिसांच्या डब्यातून बाहेर येताना दिसत आहेत.त्याच वेली मेट्रोच्या बाहेर काही महिला पोलिस असतात. त्या त्यांना चांगलाच चोप देतात. काही पोलीस मेट्रोच्या महिला डब्यात घुसतात आणि आतील सर्व पुरुष प्रवाशांना मारहाण करून बाहेर ढकलतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रामाणात व्हायरल होत आहे.अनेकांनी व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी पोलिसांच्या या कृतीचे समर्थन केले तर अनेकांनी याला चुकीचेही म्हटले.
हे देखील वाचा- नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर महिलेने मुलांसोबत केले असे काही…; पाहून नेटकरी म्हणाले
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @epic.insta.daily या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, बरं झाले चांगलाच चोप मिळाला, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, पण त्या डब्यात एकही महिला दिसत नाहीत, मग त्यांना का मारले, आणखी एका युजरने म्हटले आहे की, जर पुरूषांनी भरलेल्या डब्यात एखादी महिला असती कर तिला सगळे बिचारी म्हटले असते. या व्हिडिओवर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रीया दिल्या आहेत.
हे देखील वाचा- बाप रे! तरूणाने सापाला दिला CPR पण पुढे जे घडले…; पाहून बसेल धक्का, व्हिडिओ व्हायरल