फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे धक्कादायक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून आपले हसू आवरत नाही. कधी भांडणाचे, कधी जुगाड आणि स्टंटचे तर कधी डान्स रील्स असे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याशिवाय तुम्ही सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील. तुम्ही अनेकांना एखाद्या प्राण्याला CPR देतानाचे व्हिडिओ पाहिले असतील.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या तरूणाने सापाला सीपीआर दिला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ गुजरातच्या वडोदरा शहराती असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचे धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सापांना वाचवणाऱ्या यश तडवीचा आहे. त्याला काही लोकांनी साप बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर कॉल करून बोलावले होते. त्याने लगेचच त्या ठिकाणी जाऊन त्या सापाला वाचवले.
सापाला CPR
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्याच्या कडेला काही गाड्या उभ्या आहेत. त्याच ठिकाणी यश तडवी येतो आणि कोपऱ्यात पडलेल्या सापाला उचलतो. तो साप मेल्यासारखे वाटत असते. यश लगेचच सापाला सीपीआर देतो. तो असे तीन वेळा करतो आणि काही वेळाने साप जिवंत झाल्याते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता.त्याने सापाला सीपीआर देण्यासाठी त्याची मान पकडली आणि त्याचे जबडे वेगळे केले. त्याने त्याला तोंडातून तीन मिनिटे श्वास दिला. तिसऱ्या प्रयत्नात, सापाने काही हालचाल दर्शविली. या रेस्क्यू व्हिडिओने सोशल मीडियावरील लोकांना आश्चर्यात पाडले असून अनेकांनी तडवीच्या या धाडसी कृतीचे कौतुक केले आहे.
व्हायरल व्हिडिओ
Vadodara youth & Snake Rescuer Yash Tadvi brings Snake back to life with Mouth-to-Mouth CPR! #vadodara pic.twitter.com/MP1DFHLYst
— My Vadodara (@MyVadodara) October 16, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MyVadodara या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देत यश ताडवीचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, तुम्हाला भिती नाही का वाटली, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, भाऊ तुमच्या तोंडात त्या सापाचे विष जाईल, तर आणखी एका युजरने त्याचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.