बदकाच्या मागे पळू लागला कुत्रा, बदकानेही दिले गोड प्रतिउत्तर, प्राण्यांची मजामस्ती पाहून हास्याने लोटपोट व्हाल; Video Viral
सोशल मीडियावर प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक व्हिडिओज शेअर होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी थक्क करतात. आताही इथे वन्य जीवनाशी संबंधित एक गोड व्हिडिओ शेअर झाला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोल्डन रिट्रीव्हर आणि बदक यांच्यातील मजेदार खेळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही भान हरपून असे एकमेकांसोबत खेळू लागतात की पाहून सर्वच थक्क होतात. हा व्हिडिओ आता अनेकांचे मनोरंजन करत असून लोक वेगाने त्याला शेअर करत आहेत.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, सुरुवातीला कुत्रा बदकाच्या मागे धावतो, परंतु काही वेळाने कथा पूर्णपणे बदलते. व्हिडिओच्या सुरुवातीला कुत्रा बदकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत आहे. बदक पाण्यात आहे आणि कुत्रा किनाऱ्यावर उभा राहून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. कुत्र्याचा उत्साह पाहून तो बदकाला पकडणारच असे वाटते मात्र तितक्यात बदक हुशारी दाखवत इकडे-तिकडे पाण्यात वेगाने पळत राहते. हा खेळ काही काळ चालू राहतो, पण नंतर अचानक बदक पलटवार करते आणि वेगाने कुत्र्याच्या दिशेने जाऊ लागते.
बदक आपल्या दिशेने येत असल्याचे कुत्रा पाहतो आणि उलटे पाय घेऊन तेथून पळू लागतो. पूर्वी बदकाचा पाठलाग करणारा कुत्रा आता पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा सीन इतका मजेशीर आहे की व्हिडिओ पाहणाऱ्यांना हसू आवरता येत नाही. सुरुवातीच्या मजा आणि खेळानंतर, कुत्रा आणि बदक मित्र बनतात आणि एकमेकांशी खेळू लागतात. प्राण्यांमध्येही मजा आणि मैत्रीचे अनोखे नाते असल्याचा पुरावा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.
Golden retriever and duck playing with each other is the best thing I’ve seen today!! pic.twitter.com/0GoeSXFJEx
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) February 19, 2025
कुत्रा आणि बदकाचा हा मजेदार व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘गोल्डन रिट्रीव्हर आणि बदक एकमेकांशी खेळणे ही आज मी पाहिलेली सर्वात चांगली गोष्ट आहे!!’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कुत्रा कदाचित खेळत असेल, पण बदक नाही… तो शिकारी म्हणून त्याच्याकडे पाहतो आणि दूर पळतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खेळण्यासाठी मित्र मिळाल्याचे पाहून बदक खुश झाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.