(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यात कधी स्टंट्स दाखवले जातात, कधी जुगाड तर कधी धक्कादायक घटना… तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास असे व्हायरल व्हिडिओज तुम्ही आजवर बऱ्याचदा पाहिले असतील. हे व्हिडिओ युजर्सचे मनोरंजन करतात ज्यामुळे ते कमी वेळातच व्हायरल होतात. इथे अनेक अतरंगी घटनाही शेअर होतात ज्या पाहून कोणालाही धक्का बसेल. सध्या मात्र इथे पुण्यातील एक भीषण घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
येत्या काळात पुण्यात अनेक धक्कादायक घटना घडून आल्या. यातील काही घटनांचे व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यत आले. आताही इथे पुण्यातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यत आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. यात एका चुकीमुळे पुण्यातील एका घराला आग लागल्याची घटना घडून आली आहे. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला थक्क करतील. व्हिडीओमध्ये एका घरात आग लागल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडिओ घराच्या बाहेररून काढला असून यात घराच्या खिडकीतून आतमध्ये आग लागल्याचे समजून येत आहे. तसंच काही लोक खिडकीबाहेर उभं राहून या धक्कादायक घटनेवर उपाय शोधण्यासाठी जमा झाल्याचेही यात दिसते. घटनेत पुढे काय घडले हा जरी सांगण्यात आले नसले तरी यात घर-मालकाचे चांगलेच नुकसान झाले असल्याचे समजते. घटना भीषण असून यामागचे कारण त्याहून थक्क करणारे आहे. खरंतर ही आग गादीवर धूप पडल्याने लागली आणि पुढे जाऊन ती इतकी वाढली की या आगीने संपूर्ण घराला याला सामावून घेतले.
पुण्यात धूप गादीवर पडली अन् उडाला भडका, व्हिडिओ पाहा #punefire pic.twitter.com/OFxcC2qNIV
— sandip kapde (@SandipKapde) February 6, 2025
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @SandipKapde नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पुण्यात धूप गादीवर पडली अन् उडाला भडका’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला अनेक युजर्सने पाहिले असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.