मित्राने रस्त्यावर सोडला जीव पण श्वानाचं मन काही मानेना; डोळ्यात अश्रू अन् पंजाने करू लागला उठवण्याचा प्रयत्न; हृदयद्रावक Video Viral
मित्रांचे आपले आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असते. आपल्या चांगल्या वाईट काळात मित्रच असतात जे आपल्या मदतीसाठी नेहमी धावून येतात. चांगले मित्र कधीही आपल्या मित्राला सोडून जात नाही, मित्राची साथ सोडत नाही आणि जीवनाच्या अखेरपर्यंत मित्राचा हात धरून राहतात. मैत्रीचे हे नाते फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही तितकेच दृढ असते. प्राणी, पक्षी या सृष्टीतील प्रत्येक जीवांमध्ये भावना दडलेल्या असतात. जेव्हाही आपला जवळचा व्यक्ती आपल्याला अचानक सोडून जातो तेव्हा आपले मन त्याला सोडायला मनात नाही आणि इथूनच आपण आपल्या मनाला फसवण्याचा आणि सगळं काही ठीक असल्याचा दिखावा करू लागतो पण हृदयात भावनांचा जो कल्लोळ सुरु असतो तो चेहऱ्यावर मात्र दिसून येतोच. असेच काहीसे सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडताना दिसून आले आहे ज्यात एक कुत्रा आपल्या मृत्यू पावलेल्या मित्राला उठवण्याचा आतोनात प्रयत्न करताना दिसून येतो.
काय दिसले व्हिडिओत?
हा भावनिक व्हिडिओ सध्या सर्वांच्याच डोळ्यात अश्रू अनावर करत असून यात कुत्र्याचे दुःख स्पष्ट दिसून येते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात रस्त्याच्या कडेला एक कुत्रा मृत अवस्थेत पडल्याचे दिसून येते. पण यावेळी त्याचा मित्र दुसरा कुत्रा काही त्याची साथ सोडायला तयार नसतो. तो वारंवार आपल्या पंजाने त्याचे शरीर हलवत त्याचा उठवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर मित्राला गमावण्याची भीती आणि दुःखाने व्याकुळ झालेले डोळे स्पष्ट दिसून येतात. कुत्रा वारंवार त्याच्या नाकाने आणि पंजेने त्याला स्पर्श करतो, रडतो, जिवाच्या आकांताने तो त्याला पुन्हा उठून उभे राहण्याची इच्छा व्यक्त करतो पण मित्राचे शरीर काही त्याला उत्तर देत नाही. श्वानाचा हा व्हिडिओ आता इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरत असून लोक त्याचे दुःख पाहून व्हिडिओवर भावुक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ पुन्हा एकदा आपल्याला पटवून देतो की प्राण्यांनाही भावना असतात.
श्वानाचा हा व्हिडिओ @dineshprethiv_tn91 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याला गाडीने धडक दिली का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो अक्षरशः त्याच्या मित्रासाठी रडत आहे ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे हृदयद्रावक आहे ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.