(फोटो सौजन्य: Instagram)
प्राण्यांमध्ये सर्वात बलाढ्य कोण यावर भाष्य करणे झाले तर सर्वांच्या मनात प्रथम सिंहाचा विचार येतो. आपल्या ताकदीमुळे त्याला जंगलाच्या राजाची उपमा देण्यात आली आहे. अधिकतर सिंह हे जंगलात अथवा प्राणीसंग्रहात वास्तव करतात. आपल्या कारकिर्दीत सिंह अनेक प्राण्यांची शिकार करतो. त्याला पाहताच प्राणीच काय तर माणसंही थरथर कापू लागतात. अनेकदा अन्नाच्या शोधात सिंह जंगलातून बाहेर पडत मानवी वस्तीत एंट्री घेतो, असे जेव्हा जेव्हा घडते तेव्हा तिथे भीतीचे सावट पसरते पण सध्याच्या व्हिडिओमध्ये एक अनोखे आणि हास्यास्पद दृश्य दिसून आले आहे जिथे सिंहावर एका आज्जीने विजय मिळवत त्याला अक्षरशः एका कुत्र्याप्रमाणे हाकलवून काढले आहे. सिंहासारख्या प्राण्यावर भारी पडलेल्या या आज्जीच्या व्हिडिओ सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये असून यात नक्की काय घडलं ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक सिंह एका गावात एंट्री करून तिथे दोरीला बांधलेल्या पाळीव बकरीवर हल्ला करू पाहतो. पण असे करत असतानाच, तिथे आज्जीची एंट्री होते. आपल्या बकरीवर सिंह हल्ला करत आहे हे पाहून ती रागातच घराबाहेर येते आणि हातात असलेल्या भांड्याने सिंहाने डोकं फोडू लागते. ती सिंहाला अनेक शिव्याही देते. आज्जीचा राग इतका जबरदस्त असतो की सिंहही क्षणातच तिच्या रौद्र रुपाला घाबरतो आणि काहीही न करता गुपचूप तिकडून आपला पळ काढतो. सिंहासारख्या प्राण्यांना आज्जीने पळवून लावले हे पाहून युजर्स चांगलेच अचंबित झाले आहेत तर काही आज्जीच्या धाडसाचे मन भरून कौतुक करत आहेत.
तथापि, हा व्हिडिओ आता खरा आहे की खोटा यावर अनेकांना प्रश्न आहेत. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केला गेला आहे. सिंह आणि आजी यांच्यात असा सामना वास्तविक जीवनात होणे कठीण आहे. तरीही, या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. तो केवळ मनोरंजनच करत नाही तर धैर्य आणि शौर्य किती मोठे करू शकते हे देखील दर्शवितो. हा व्हिडिओ @i.love.srikaranpur नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “AI व्हिडिओ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज्जीशी पंगा नाय घ्यायचा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.