Stray Dogs chased a leopard thinking it was a cat see what hapeened neext Video Viral
सोशल मीडियावर रोज वेगवेगळे मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पाळीव प्राण्यांपासून ते जंगली प्राण्यांपर्यंतचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये भयक्या श्वानांचे देखील व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या एक असाच मजेशीर अन् भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी फ्लॉवर समजून अटॅक केले अन् हा तर वाइल्डफायर निघाला असे म्हटले आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये एक श्वानांची टोळी एकजूटीने मांजरीवर हल्ला करायला गेली होती, परंतु त्यांची फजिती झाली आहे. त्यानंतर सर्व वास्तव कळताच श्वानांनी तिथून पळ काढला आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना ३ जुलै रोजी घडली आहे. एक कुत्र्यांची टोळी बिबट्याला मांजर समजून त्याचा पाठलाग करायला गेले. पण सत्य समजताच त्यांनी पळ काढला. व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आहे. याच वेळी एक बिबट्या वस्तीत फिरताना दिसत आहे. त्याला पाहून कुत्र्यांचा टोळी भूंकायला सुरुवात करतात आणि त्याचा पाठलाग करायला जातात. पण एक घराच्या अंधरात जाताच बिबट्या त्यांच्यावर अटॅक करतो, यावेळी सर्व कुत्री घाबरुन दूर पळून जातात. हा व्हिडिओ इथेच संपला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
They thought it’s just a CAT😭
pic.twitter.com/EO6P9Z4ODi— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 15, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या मजेशीक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “ही सगळी मांजर समजून हल्ला करायला गेले अन्..” असे लिहिलेले आहे. “अरे ९ जण गेले होते बिबट्याच्या मागे ८ जण परत आले” असे एका युजरने म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने “ही रस्त्यावरची टाळकी स्वत:ला चौधरी समजतात” असे म्हटले आहे. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अद्याप हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.