तारेवरची कसरत श्वनालाही चुकली नाही, ऐटीत विजेच्या तारांवर उभा राहिला अन् पाहून नेटकऱ्यांचा एकच प्रश्न, "हा तिथे पोहचला कसा?"(फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात की एकदा पाहून आपले मन भरत नाही. तर काही व्हिडिओ इतके भयावह असतात की अंगावर काटा येईल. तसेच काही व्हिडिओ पाहून हसावे का रडावे कळत नाही. भांडण, स्टंट, जुगाड, डान्स रिल्स यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये प्राण्यांच देखील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये श्वानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.
यामध्ये तुम्ही पाळीव श्वानांचे, भटक्या श्वानांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये एक श्वान विजेच्या तारांवर उभा असलेला दिसत आहे. यामध्ये श्वान केवळ विजेच्या तारांवर उभा आहे, तो नेमका तिथे कसा पोहोचला, हा व्हिडिओ नेमका कुठाला आहे हे अद्याप कळालेले नाही. व्हिडिओ कदाचित एआय एडिटेड असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजूबाजूला मोठ मोठ्या इमारतींचा परिसर दिसत आहे. या इमारतीच्या लाईट्या तारा बाहेर अर्धवट लटकलेल्या दिसत आहे. यावर एक श्वान ऐटीत उभा आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाययरल व्हिडिओ
View this post on Instagram
A post shared by Atharv Mondhe | Nashik Memes Official (@nashikmemesofficial)
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @nashikmemesofficial या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. य व्हिडिओल हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला एक मीम म्हणून शेअर करण्यात आले आहे. याच्या कॅप्शनमध्ये रोज रोज कसरत तारेवरीच Gonna Be Real असे म्हटले आहे. या गाणे देखील होणार सून मी या घरची असे लावले आहे.
यावर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तसेच अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने, भाऊ एकदम ऐटीत उभा आहे, असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने भाई तो तिथे पोहोचला कसा? असा प्रश्न केला आहे. तिसऱ्या एकाने युजरने किती गोड दिसत आहे असे म्हटले आहे, तर आणखी एकाने युजरने, आशा आहे तो सुरक्षित असावा असे म्हटले आहे. परंतु सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मनोरंजनाचे काम करत आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.