चल मित्रा तुला समुद्राची सैर करवतो! चिमुकल्याला पाठीवर बसवून डॉल्फिनने दिली पाण्याची सफर, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral
सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी आणि गमतीशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका डॉल्फिनने एका चिमुकल्या मुलाला पाठीवर बसवून स्विमिंग पूलमध्ये फेरफटका घेतल्याचे दिसून येते. हे दृश्य इतकं आकर्षक आहे की अनेकांनी यावर प्रेमाचा वर्षाव केला. व्हिडिओत असं दिसतं की एक आई आपल्या मुलासोबत स्विमिंग पूलमध्ये आहे आणि त्यांच्यासोबत एक प्रशिक्षित डॉल्फिनही आहे. यांनतर अचानक डॉल्फिन त्या मुलाला आपल्या पाठीवर बसवते आणि त्याला समुद्राची सैर घडवून आणते. मुलगाही या क्षणाचा चांगलाच आनंद लुटतो. डॉल्फिनबरोबर मुलाने घेतलेली ही अनोखी जलसफर आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
काय घडलं व्हिडिओत?
डॉल्फिनने आवडीने मुलाला करून दिलेली ही जलसफर युजर्सना इतकी भावली की व्हिडिओ शेअर होताच लोकांनी वेगाने त्याला शेअर करण्यास सुरुवात केली. लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिलाय, त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि डॉल्फिनच्या बुद्धिमत्तेचं, तर मुलाच्या निरागस आनंदाचं कौतुक केलं आहे. व्हिडिओमध्ये शेवटी आपण डॉल्फिनला आनंदाने पाण्यात डान्स करतानाही पाहू शकतो, तिने दिलेल्या या सफरची परतफेड म्हणून मुलाची आई तिला मासा देऊ पाहते जे पाहून डॉल्फिन खुश होते आणि आनंदाने पाण्यात विहार करत तेथून निघून जाते. अनेकांनी या दृश्याला “निसर्ग आणि मानवतेतील सुंदर मैत्रीचं प्रतीक” असं म्हटलं आहे, तर काहींनी याला “प्रेम आणि आपुलकीचा अपूर्व संगम” असंही संबोधलं आहे. डॉल्फिनला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान आणि संवेदनशील प्राण्यांपैकी एक मानलं जातं. त्यांचं माणसांशी असणारं स्नेहशील वर्तन आणि त्यांच्या भावनात्मक समजुतीमुळे त्यांचा वापर अनेक वेळा थेरपीमध्येही केला जातो. विशेषतः डॉल्फिन थेरपीचा उपयोग काही देशांमध्ये मुलांच्या व प्रौढांच्या मानसिक आरोग्यासाठी केला जातो.
Dolphin takes the child for a ride pic.twitter.com/UjbFoC8gnD
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 29, 2025
या व्हिडिओमधून डॉल्फिनचं मैत्रीपूर्ण आणि काळजीवाहू स्वभाव स्पष्टपणे दिसून येतो. मुलाला सुरक्षितपणे पाठीवर घेऊन पूलमध्ये फिरवण्याची डॉल्फिनची पद्धत तिच्या बुद्धिमत्तेचा आणि भावनिक समजुतीचा उत्तम नमुना आहे. हा व्हिडिओ केवळ एक मनोहारी दृश्य नाही, तर माणूस आणि निसर्ग यांच्यातील अतूट नात्याची साक्ष देणारा एक सुंदर अनुभव आहे. दरम्यान हे मनमोहक दृश्य @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी डॉल्फिनसोबत माझ्या मुलाला कधीही असं पाठवणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे गोंडस आहे.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूपच सुंदर आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.