(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलात कुणाचं राज्य चालतं यावरच वादच नाही. हजारो प्राण्यांचे इथे वास्तव असले तरी जंगलाचा राजा मात्र एकच! सिंह हा एकमेव असा प्राणी आहे ज्याला जंगलाच्या राजाची उपमा देण्यात आली आहे. आपल्या प्रचंड ताकदीने आणि शक्तीने तो कोणत्याही प्राण्याला मृत्यूची घरी पोहचवू शकतो. पण राजा म्हटलं की विषय येतो तो एकाचा… सिंह जंगलाचा राजा असला तरी संपूर्ण जंगलात काही एकाच सिंह नव्हे. अशात सिंहाच्या या कळपात शेवटी राजा होणार एकच आणि यावरूनच जंगलात दोन सिंहांमध्ये एक जबरदस्त युद्ध रंगल्याचे दिसून येते. सिंहा विरुद्ध सिंह अशी ही मजेदार लढत आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चला यात काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात जंगलात दोन सिंहांमध्ये एक मजेदार लढत रंगल्याचे दिसून येते. कुश्तीत जसा पैलवानाला जमीनदोस्त करावं अगदी तसेच हे दोन्ही सिंह एकमेकांवर भारी पडतात आणि धोबीपछाड एकमेकांना जमीनदोस्त करतात. व्हिडिओच्या सुरुवातीला दोन्ही सिंह वेगवेगळ्या दिशेने एकमेकांकडे धावताना दिसून येतात. एक उजवीकडून आणि दुसरा डावीकडून पळत असतो पण अखेर तलावाच्या काठावर पोहोचताच त्यांची टक्कर सुरू होते. दोघांचीही शरीरयष्टी जवळजवळ सारखीच आहे, ज्यामुळे कोण जास्त शक्तिशाली आहे याचा अंदाज लावणे कठीण होते. वर्चस्वाची ही लढाई इथेच संपते ज्यामुळे नक्की विजयी कोण ठरला ते सांगणे जरा कठीण होऊन बसते. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला दोन्ही सिंह वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसून येतात ज्यामुळे त्यांचे हे युद्ध त्यांनी एकमताने संपल्याची कल्पना केली जाऊ शकते. कमी वेळ रंगलं पण युद्धाने सर्वांचं मनोरंजक केलं आणि म्हणूनच युद्धाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर आता चांगलाच लक्षवेधी ठरत आहे.
बाप्पा जे तुझं, ते माझं…! नैवेद्याच्या ताटातून उंदरानं पळवला मेदूवडा; गुपचूप चौरंगाखालून आला अन् क्युट Video Viral
या मजेदार लढतीचा व्हिडिओ @lionsightings नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “राजाची शक्ती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गाडीत बसून तरस हसत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे मजेदार होत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.