(फोटो सौजन्य: Instagram)
हत्ती हा जंगलातील सर्वात वजनदार आणि विशालकाय असा प्राणी आहे. त्याच्या एका पंजाने तो कुणालाही पायदळी तुडवू शकतो पण मुळातच हत्तीचा स्वभाव जरा मनमिळाऊ आणि प्रेमळ असा असतो. ते विनाकारण बहुधा कुणावर हल्ला चढवत नाही आणि माणसांसोबतही प्रेमाने राहतात. हेच कारण आहे की बऱ्याच ठिकाणी हत्तीला पाळले जाते. मनमिळाऊ, हसमुख आणि विशाल दिसणाऱ्या या हत्तीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात अशातच आणखीन एक मजेदार आणि सर्वांना थक्क करणारा हत्तीचा आणखीन एक नवा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यात तो एका महिलेची मसाज करताना दिसून आला.
मुख्य म्हणजे, ही मसाज करत असताना हत्ती महिलेच्या सुरक्षेची काळजी घेत फार कोमलतेने आणि अलगद आपल्या पायाने ही मसाज करतो जेणेकरून महिलेला कोणतीही दुखापत होऊ नये. त्याचा हा व्हिडिओ आता सर्वांनाच खुश करत असून मिश्किलरित्या हत्तीने केलेली मसाज पाहून आता सर्वांनाच हसू अनावर झाले आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक महिला मसाज करून घेण्यासाठी खाली जमिनीवर लेटल्याचे दिसते. यावेळी तिच्याबाजूला हत्तीचा मालक उभा असतो जो तिच्या कमरेवर एक कपडा ठेवून देतो आणि तितक्यातच तिथे एंट्री होते भल्यामोठ्या हत्तीची… हत्तीचा मालक त्याच्या पायाला हात लावत त्याला इशारा देतो आणि हत्ती आपल्या पायांना हळूहळू महिलेच्या कमरेवर ठेवत तिला एक सौम्य मसाज देऊ लागतो. महिलेची सुरक्षा बघता तो अजिबात आपले पाय जोरात ठेवत नाही तर अगदी समजूतदारपणे सौम्य स्पर्श करत तिला मसाज देऊ लागतो, जे पाहून युजर्स भारीच खुश होतात. माहितीनुसार हा व्हिडिओ थायलंडच्या एलिफंट आयलंडचा आहे. व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून हत्तीच्या कृत्याने आता सर्वांचेच मन जिंकून घेतले आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @talkingmona नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती गोड, सौम्य छोटे छोटे स्पर्श” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्राण्यांचा असा वापर करणे थांबवले पाहिजे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एक चूक आणि पुढे काय होईल ते आपल्याला माहिती आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.