(फोटो सौजन्य: X)
जंगलाच्या राजाची दहशत… विशाककाय घोड्याचा गळा धरला अन् ओढतंच अरण्यात नेलं; शिकारीचा थरारक Video Viral
केरळ ते काश्मीर विना फ्रंट व्हील सायकलचा प्रवास
सनीदने सांगितले की, याआधीही विना फ्रंट व्हील सायकलने त्याने केरळ ते काश्मीरपर्यंतचा प्रवास केला आहे. यावेळी त्याने केरळ ते एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचा प्रवास सुरु केला आहे. त्याचे मते, या यात्रेत त्याने ७००० किलोमीटरहून अधिकचे अंतर कापले आहे. सनीद दररोज ५० ते ६० किलोमीटर सायकल चालवतो. तथापि, रस्ता आणि ऋतूच्या स्थितीच्या आधारावर अंतर हे बदलत असते. त्याचा एका दिवसात १५० किलोमीटर सायकल चालवण्याचा रेकाॅर्ड आहे.
भारतीय सेनेच्या जवानांना देतो ट्रेनिंग
सनीदने सांगितले की, विना फ्रंट व्हील सायकल चालवणे सामान्य सायकल चालवण्याच्या तुलनेत फार कठीण आहे. खास करुन वाऱ्याच्या वेळी तोल सावरणे आणखी कठीण होऊन बसते. तथापि, सनीदला अशाप्रकारे सायकल चालवण्याचा साधारण १२ वर्षांचा अनुभव आहे. तो सिव्हील इंजिनीयर असून इंटीरियर डिझायनिंगचेही प्रशिक्षण त्याने पूर्ण केले आहे. आपल्या आवडीमुळे तो अनेक बाईक स्टंटही करत असतो. त्याच्या मते, तो भारतीय लष्करातील सैनिकांना परेड स्टंटचे प्रशिक्षणही देतो.
बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती पत्नी, मागून पती आला अन् भररस्त्यात सुरु झाला राडा; Video Viral
लोकांना व्यसनापासून दूर करण्याचा संदेश
सनीदचे म्हणणे आहे की, त्याच्या यात्रेचा मूळ उद्देश केरळ, तामिळनाडू आणि संपूर्ण भारतात अमली पदार्थांच्या गैरवापराविषयी जागरूकता पसरवणे हा आहे. आयुष्यात काहीतरी वेगळे मिळवण्यासाठी आणि आनंद शोधण्यासाठी अमली पदार्थांचे सेवन करण्याची गरज नाही असा संदेश त्याला लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. त्याने सांगितले की, जर त्याच्या यात्रेमुळे एकानेही आपला विचार बदलला आणि नशेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यासाठी ही त्याची खरी उपलब्धी आणि ‘जागतिक विक्रम’ असेल.





