
वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं
आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!
काय घडलं व्हिडिओत?
अमेरिकेतील एका हायस्कूलच्या ट्रॅक मीटमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होते. खेळाडू त्यांच्या स्पर्धेसाठी तयार होते आणि यातच एक वयस्कर खेळाडू यात सर्वात जास्त लक्षवेधी ठरली. हातात खांब, झुकलेली मान आणि हळूहळू पाऊले टाकत वयस्कर महिला खेळासाठी सज्ज झाली. तिने अमेरिकेच्या झेंड्याचा टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शॉर्ट्स घातले होते. चेहऱ्यावरील त्या सुरकुत्या आणि कमकुवत पडलेले शरीर पाहून अनेकांना वाटते की महिला काही करु शकणार नाही पण पुढच्याच क्षणी अनोखं घडतं. हातात खांब घेऊन महिला हळूहळू पोलच्या दिशेने धावली आणि तिने उंच झेप घेत खेळ यशस्वी करुन दाखवला. उंची उडी घेत ती बरोबर खांब्याच्या दुसऱ्या दिशेने वळली आणि खाली असलेल्या गाद्यांवर तिने उडी मारली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद होता तर इतरांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसून येत होते. आज्जींचा हा पराक्रम सोशल मिडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्यांच्या हिमतीसाठी अनेकांनी व्हिडिओवर काैतुकांचा वर्षाव केला आहे.
बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
हा व्हिडिओ @Senior Salute नावाच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ६,७ मिलियन व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “मी तरुणपणात म्हातारा होत चाललोय आणि आज्जी म्हातारपणात तरुण होत चाालल्यात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज्जीबाईंची होती नव्हती तेवढी सगळी हाडे तुटली असावीत”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने त्यांच्या मेहनतीचे चीज केले”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.