भुकेल्या हत्तीची दुकानात एंट्री; अन्नाचा साठा पाहून खुश झाला अन् क्षणातच 2 पोती तांदळाचा फडशा पाडला; मजेदार Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार व्हिडिओ शेअर केले जातात. हे व्हिडिओ आपल्या मनोरंजनाचे काम करतात ज्यामुळे लोक आवडीने हे व्हिडिओ पाहतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या आयुष्याशी निगडित देखील अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. आताही इंटरनेटवर एका हत्तीचा व्हिडिओ सध्या फार चर्चेत आहे. जंगलात आढळून येणारा हा विशालकाय प्राणी जेव्हा मानवी वस्ती आला तेव्हा त्याला पाहून सर्वच अचंबित झाले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये गजराजने थेट एका दुकानात एंट्री घेतल्याचे दिसून आले आहे. भुकेने व्याकुळ जेव्हा तो दुकानात अन्नाचा साठा पाहतो तेव्हा क्षणाचाही विलंब न करता दुकानातील तांदळावर तो तुटून पडतो. हे सर्व दृश्य आता एकाने आपल्या कॅमेरात कैद केले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल होणारा हा व्हिडिओ थायलंडमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. इथे एका जनरल स्टोअरमध्ये एक हत्ती उभा असल्याचे दिसून येते. हत्तीची उंची इतकी जास्त होती की त्याचं डोकं दुकानाच्या छताला टेकल्याचे व्हिडिओत दिसून आले. हत्ती भुकेने व्याकुळ झाला होता ज्यामुळे दुकानात जाताच त्याने आपली पोटपूजा करायला सुरुवात केली. एवढेच काय तर त्याने दुकानातून निघताना काही राइस क्रॅकर्सदेखील आपल्या सोबत नेल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक या दृश्यांची चांगलीच मजा लुटत आहेत.
हत्तीचा हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे.तसेच अनेक युजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो बोलत असेल एक मोठा तुकडा द्या मला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो दरवाज्यातून आत आला?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो सहलीला जात होता आणि त्याला फक्त स्नॅक्सची गरज होती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.