वेदना असह्य झाल्या म्हणून हत्तीणीने रेल्वे ट्रॅकजवळच दिला मुलाला जन्म; तब्बल दोन तास ट्रेन थांबून राहिली अन्... Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक निरनिराळे व्हिडिओज व्हायरल होतात जे आपल्या कल्पनेपलीकडचे ठरतात. आता मात्र इथे एक सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो आपल्याला माणुसकीचे दर्शन घडवून देतो. माणसाने ठरवलं ते तो हे निसर्ग आणखीन सुंदर बनवू शकतो, हा विचार या व्हिडिओतून नजरेस पडतो. वास्तविक झारखंडमधील एका हत्तीणीची रेल्वे ट्रकजवळचा प्रसूती झाली आहे. आपल्या वेदना असह्य होत असल्याचे जाणवताच तिने रेल्वे ट्रॅक शेजारी आपल्या मुलाला जन्म दिला. यावेळी तेथून एक मालगाडी देखील जाणार होती मात्र प्रसूतीच्या काळात हत्तीणीला त्रास होऊ नये म्हणून लोको पायलटने तब्बल दोन तास ट्रेन थांबवून ठेवली. व्हिडिओमध्ये प्रसूतीनंतर जन्माला आलेला छोटा हत्ती देखील दिसून आला. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय घडलं?
झारखंडमधून एक हृदयस्पर्शी व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे, ज्यात माणुसकीचे दर्शन घडून आले. गर्भवती हत्तीणी जंगलातून फिरत फिरत रेल्वे ट्रॅकजवळ आली आणि इथेच तीला प्रसूतीच्या कळा जाणवू लागल्या. मुख्य म्हणजे यावेळी तेथून एक ट्रेन जाणार होती मात्र हत्तीणीचे हे हाल पाहून त्यांना ट्रेन थांबवण्याही निर्णय घेतला. हत्तीणीला तिच्या बाळाला न घाबरता जन्म देता यावा म्हणून ट्रेन सुमारे दोन तास थांबवण्यात आली. यादरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी दुरूनच हत्तीणीची काळजी घेतली आणि तिला सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने, हत्तीणीने एका सुंदर बाळाला जन्म दिला आणि आई आणि बाळ दोघेही सुरक्षितपणे जंगलात परतले. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला चिमुकला हत्ती आपल्या आईसह जंगलात जाताना दिसून येतो.
Beyond the news of human-animal conflicts, happy to share this example of human-animal harmonious existence.
A train in Jharkhand waited for two hours as an elephant delivered her calf. The 📹 shows how the two later walked on happily.
Following a whole-of government approach,… pic.twitter.com/BloyChwHq0
— Bhupender Yadav (@byadavbjp) July 9, 2025
या घटनेचा एक सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोको पायलटचा उदारपणा पाहून आता युजर्स चांगलेच सुखावून गेले आहेत आणि या गोष्टीची प्रशंसाही करत आहेत. याचा व्हिडिओ @byadavbjp नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “योग्य वेळी गाडी थांबवून आई आणि तिच्या वासराला वाचवणाऱ्या ट्रेन चालकाला सलाम” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दयाळू कर्मचाऱ्यांना मूक हत्तीणीच्या आई आणि बाळाचा आशीर्वाद मिळेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरोखरच हृदयस्पर्शी, संपूर्ण टीमचे अभिनंदन”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.