केरळच्या पुरात गजराजाचे हाल झाले बेहाल; तब्बल ३ तास लाटांना झुंज दिली पण शेवटी जे घडलं.... Video Viral
पावसाने आता जवाजवळ अनेक ठिकाणी आपली हजेरी दर्शवली आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे ज्यामुळे ठिकठिकाणी भूस्खलन तसेच पाणी साठू लागले आहे. अलिकडेच केरळमध्ये मुसळधार पाऊस पडला, ज्यानंतर पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली. याच पुरात एक हत्ती अचानक अडकला गेला. तब्बल ३ तास तो या पुरात अडकून लाटांना झुंज देत राहिला आणि याच घेतनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
पांचट Jokes: मुलगा… आई, गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते? उत्तर ऐकाल हसून हसून वेडे व्हाल
काय आहे प्रकरण?
केरळच्या वाझाचल परिसरात ही घटना घडून आली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एक हत्ती चालकुडी नदीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जाताना दिसत आहे. बिचारा हत्ती अनेक तास या पाण्यात अडकून राहतो आणि इथून निघण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र तो पुराच्या पाण्यात मध्येच अडकला जातो. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की हत्ती पाण्याच्या मध्यभागी उभा आहे आणि हळूहळू किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे अर्धे शरीर पाण्यात बुडाले आहे, परंतु तरीही तो सतत प्रयत्न करत राहतो.
हत्ती अशाप्रकारे पाण्यात अडकला जातो की, तिथे उपस्थित असलेले लोकही त्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा वन अधिकाऱ्यांना हत्ती अडकल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. त्याला भीती होती की हत्ती पाण्यात वाहून जाईल, म्हणून त्याने धरण अधिकाऱ्यांना पाण्याचा प्रवाह कमी करण्यास सांगितले. या निर्णयामुळे हत्ती नदी ओलांडू शकला आणि सुमारे ३ तासांनंतर तो नदी ओलांडून जंगलात परत गेला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी हत्तीच्या धाडसाचे कौतुक केले तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे आभार मानले.
JUST IN: A wild #elephant crossing the Chalakudy river in spate at Athirappilli in #Thrissur. Video: Special Arrangement pic.twitter.com/yxqx1aPvs3
— The Hindu – Kerala (@THKerala) August 2, 2022
घटनेचा व्हिडिओ @THKerala नावाच्या इंस्टाग्राम एक्स शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून हजारो अनेक व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे, तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो सुरक्षित आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ओलांडणे धोकादायक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.