Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भररस्त्यात हत्तीला पाहताच रिक्षाचालकाचा तोल ढळला अन् क्षणार्धातच नको ते होऊन बसलं, Video Viral

भररस्त्यात अचानक हत्ती समोर आल्याने समोरून वेगात येणाऱ्या रिक्षा चालकाचा तोल ढासळला आणि क्षणार्धात नको ते होऊन बसलं. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण आता हा व्हिडिओ पाहून थक्क होत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 02, 2024 | 01:05 PM
भररस्त्यात हत्तीला पाहताच रिक्षाचालकाचा तोल ढळला अन् क्षणार्धातच नको ते होऊन बसलं, Video Viral

भररस्त्यात हत्तीला पाहताच रिक्षाचालकाचा तोल ढळला अन् क्षणार्धातच नको ते होऊन बसलं, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

जंगल परिसरातून जाणाऱ्या रस्त्याने वाहन चालवणे काही सोपे काम नाही. यात सर्वात मोठा धोका म्हणजे जंगलातून कधी कोणता जीवघेणे प्राणी समोर येईल याचा नेम नसतो. सावधानतेसाठी बऱ्याचदा अशा रस्त्यांवर वन विभागाकडूनही प्राण्यांपासून सावधान, असे फलक लावलेले दिसतात. कारण अशात प्राण्यांकडे दुर्लक्ष करणे गाडी चालकाला महागात पडू शकते. जंगल वाटेतून वाहन चालवताना चालकाने केलेली एक चूक त्याने चांगलीच महागात पडू शकते. याचेच दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील दृश्ये पाहून थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. यात रस्त्याने भरधाव वेगाने रिक्षा चालवता अचानक हत्ती समोर आल्याचे दिसून येत. हत्तीचे असे अचानक समोर आल्याने रिक्षा चालकाचा तोल ढासळतो आणि घाबरतो. भीतीने त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटते आणि दुसऱ्याच क्षणी रिक्षा हत्तीसमोर उलटी होते. हत्तीला पाहून रिक्षाचालकानं रिक्षा बाजूला घेत निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि रिक्षा रस्त्यावर उलटी पडली.

हेदेखील वाचा – जणू दुर्गाच अवतरली! तीन चोरांना एकटीच भिडली महिला, पहा कसे पळवून लावले सर्वांना, Video Viral

रिक्षा उलटी होताच त्यात बसलेले सर्व प्रवासी फार घाबरतात आणि एक एक करून सर्वजण या रिक्षातून बाहेर पडून तेथून पळण्याचा प्रयत्न करू लागतात.मुख्य म्हणजे, यात हत्तीला तसेच कोणत्याही प्रवाशाला कोणतीही हानी झाली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ नक्की कुठला हे अद्याप समोर आलेले नाही.

हेदेखील वाचा – इंडिगो फ्लाईटमधील प्रवाशांचा गोंधळ, क्रू मेंबर्सला काढलं बुकलून, धक्कादायक Video Viral

या सर्व घटनेचा व्हिडिओ @wildtrails.in नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “एक किलोमीटर आधी थांबला पाहिजे होता; पण जवळून कटिंग घेण्यासाठी पुढे आला.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याला एलिफंट अटॅक नाही, तर पॅनिक अटॅक, असे म्हणतात. ” आणखीन एका युजरने लिहिले, “करण्याआधीच रिक्षा उलटी झाली”.

Web Title: Elephant viral video auto lost balance and met with accident after seeing elephant coming from watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 01:05 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

संतापजनक! पार्सल देताना डिलिव्हरी बॉयने महिलेला ‘त्या’ ठिकाणी केला स्पर्श ; पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL
1

संतापजनक! पार्सल देताना डिलिव्हरी बॉयने महिलेला ‘त्या’ ठिकाणी केला स्पर्श ; पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral
2

दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral

बकरीने घोरपडीला केलं हैराण, जंगलभर पळवलं पण तरीही लागली नाही हाती; पकड पकडीचे ते दृश्य अन् मजेदार Video Viral
3

बकरीने घोरपडीला केलं हैराण, जंगलभर पळवलं पण तरीही लागली नाही हाती; पकड पकडीचे ते दृश्य अन् मजेदार Video Viral

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral
4

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.