सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. त्यातच आता यावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका घरावर तीन चोरांनी हल्ला केल्याचे दिसून येत आहे. एवढेच काय तर, या तीन चोरांना एकाच महिलेने अशी लढत दिली आहे की शेवटी चोरांनाही तिच्यासमोर नतमस्तक व्हावे लागले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात महिलेच्या सामर्थ्याचे दर्शन घडत आहे.
पंजाबमधील अमृतसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वेरका येथे तीन चोरट्यांनी भरदिवसा एका ज्वेलर्सच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या बुद्धिमत्तेमुळे आणि धाडसामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – इंडिगो फ्लाईटमधील प्रवाशांचा गोंधळ, क्रू मेंबर्सला काढलं बुकलून, धक्कादायक Video Viral
अमृतसरमध्ये राहणाऱ्या मनप्रीतने सांगितले की, ती कपडे सुकवण्यासाठी टेरेसवर गेली होती. त्याच्या घराबाहेर तीन तरुण तोंडावर कापड बांधून उभे असल्याचे त्याने वर पाहिले. तिला संशय आला आणि ती खाली येताच तीन चोरांनी भिंतीवर उडी मारत घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरु केला. हे पाहताच महिलेने क्षणार्धात घराचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. यानंतर या चोरांनी ताकदीनिशी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने दरवाजा इतक्या चपळतेने जोरदार पकडला की यापुढे तीन चोरांचे शौर्यही फिके पडले.
महिला सतत मदतीसाठी ओरडतच राहिली आणि मोठ्या शौर्याने तिने चोरांना घरात येण्यापासून रोखले आणि दरवाजा बंद करून त्यासमोर जवळील सोफादेखील नेऊन ठेवला जेणेकरून चोरांनी कितीही ताकद दाखवली तरी त्यांना आत शिरता येत नये . नंतर प्रचंड आवाजामुळे तिन्ही चोरटे घाबरले आणि तेथून पळून गेले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सध्या हल्लेखोर फरार आहेत, मात्र आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
यह वीडियो अमृतसर का बताया जा रहा है
एक महिला ने बहादुरी से तीन चोरों का सामना किया दरअसल उसके घर तीन चोर चोरी करने आए थे पर उनके सारे पृयास असफल साबित हुए |
इस महिला की बहादुरी के लिए एक लाइक तो बनता है| 🙏 pic.twitter.com/SnAf08ZPOi
— Mohit (@Themassmohit) October 1, 2024
हेदेखील वाचा – 83 लाख पगार तरीही भागत नाहीयेत गरजा, कॅनडात राहणाऱ्या भारतीय तरुणाने व्यक्त केली व्यथा, Video Viral
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @Themassmohit नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. शेअर करताच हा व्हिडिओ फार व्हायरल झाला असून अनेकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “महिला धाडसी निघाली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “महिलेचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे”.