Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोट दुर्घटनेचा थरार! काही क्षणातच शेकडो लोक झाली समुद्रात विलीन, Viral Video नक्की कुठला?

Mumbai boat accident Video: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीबरोबर एक भीषण दुर्घटना घडून आली. यात शेकडो प्रवासी बुडाले तर काहींचा जागीच मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओ आता फार व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 07, 2025 | 10:19 AM
बोट दुर्घटनेचा थरार! काही क्षणातच शेकडो लोक झाली समुद्रात विलीन, Viral Video नक्की कुठला?

बोट दुर्घटनेचा थरार! काही क्षणातच शेकडो लोक झाली समुद्रात विलीन, Viral Video नक्की कुठला?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीबरोबर एक भीषण दुर्घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. अरबी समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडून आली. यात दुर्घटनेत शेकडो प्रवासी समुद्राच्या खोल गाभाऱ्यात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. यात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, ज्यात नौदलाच्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान या दुर्घटनेचा एक थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. यात प्रवाशांनी खाचखच भरलेली बोट खोल समुद्रात विलीन होताना म्हणजेच बुडताना दिसून येत आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये, या व्हिडिओतील दृश्ये ही मुंबईतील बोट दुर्घटनेची असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र विश्वास न्यूजने जेव्हा या व्हिडिओची पडताळणी केली तेव्हा याबाबत एक वेगळाच खुलासा करण्यात आला आहे. नक्की काय आहे प्रकरण? चला सविस्तर जाणून घेऊयात.

सोते हुए शेर को नहीं जगाना चाहिए! झोपलेल्या वाघावर भुंकणे श्वानाला पडले महागात, पुढे जे घडले… थरारक Video Viral

काय आहे प्रकरण?

तर 19 डिसेंबर 2024 रोजी @mumbai.hai.hai नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ शेअर करताच फार वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये, ‘अलिबागहून गेट वे ऑफ इंडियाला येताना बोट उलटली’ असे लिहिण्यात आले आहे.

तपास:

या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी व्हिडीओचे कीफ्रेम गूगल लेन्सवर सर्च करण्यात आले. या तपासात हा व्हिडिओ खरंतर, 4 ऑक्टोबर 2024 रोजी न्यूज एजन्सी असोसिएट प्रेसच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आल्याचे दिसून आले. यात असे लिहिले होते की, ‘काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकमधील किवू तलावामध्ये शेकडो लोकांनी भरलेली बोट उलटून किमान 78 जणांचा मृत्यू झाल्याचे लाईव्ह फुटेज एका प्रत्यक्षदर्शीने चित्रित केले’.

याचप्रमाणे या शोधात आणखीन एका जागी हा व्हिडिओ अपलोड केल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क आफ्रिका या युट्युब चॅनेलवरून अपलोड करण्यात आला होता. याजागीही हा व्हिडिओ काँगोच्या दुर्घटनेचा असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच काय तर, यांनतर मुंबई बोट दुर्घटनेचे व्हिडिओ देखील तपासण्यात आले जे या व्हायरल व्हिडिओपेक्षा फार वेगळे आहेत.

अधिक माहितीसाठी मिड डेचे वरिष्ठ रिपोर्टर समिउल्ला खान यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ज्यात त्यांनी खुलासा करत सांगितले की, हा व्हायरल व्हिडीओ मुंबई बोट दुर्घटनेच्या घटनास्थळाचा नाही. त्यांनी हा व्हिडिओ गोव्यातील असल्याचा दावा केला जो यापूर्वीही एकदा व्हायरल करण्यात आला होता.

किंग कोब्राशी मस्ती करणं पडलं महागात, Kiss करायला जाताच कोब्राने केलं असं… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

निष्कर्ष :

विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आढळून आले. यातून हेच निष्कर्ष समोर येत आहेत की, हा काँगोमधील बोट दुर्घटनेचा व्हिडीओ असून यात ह्या व्हिडिओ मुंबईतील बोट दुर्घटनेचा असल्याचा खोटा आणि फसवा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी हा असा खोटा दावा यात करण्यात आला असावा.

Web Title: Fact check viral video claiming mumbai boat accident visuals but the video is actually from congo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • accident video
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर
1

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

कधी नव्हे ते आता घडलं! समुद्रात चालताना दिसला वाळवंटाचा जहाज, दृष्य इतके अद्भूत की Viral Video ने क्षणात वेधले यूजर्सचे मन
2

कधी नव्हे ते आता घडलं! समुद्रात चालताना दिसला वाळवंटाचा जहाज, दृष्य इतके अद्भूत की Viral Video ने क्षणात वेधले यूजर्सचे मन

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral
3

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.