(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
किंग कोब्राचे नाव ऐकताच लोक उलटे पाय धरून पळू लागतात. माणसचं काय तर मोठमोठी प्राणीही कधी कोब्राच्या रस्त्याला जात नाहीत. किंग कोब्रा हा धोकादायक आणि विषारी प्राणी आहे, त्याच्या एका दंशानेच तो समोरच्या व्यक्तीला थेट मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो. अशात कोणीही त्याच्या जवळ जाण्याचे साहस दाखवत नाही. मात्र त्याचबरोबर काही अतिउत्साही लोक व्हायरल होण्याच्या नादात किंवा स्वतःला फेमस करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून सापांशी खेळताना दिसून येतात.
विषारी सापांशी मस्ती करणं आपल्या जीवावर बेतू शकते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती किंबग कोब्राचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करत असतो मात्र कोब्रा क्षणार्धात असा डाव बदलतो की पाहणारे सर्वच थक्क होऊन जातात. कोब्रासोबत अशी मस्ती करणं तरुणाला चांगलंच महागात पडतं आणि त्याला जन्माची अद्दल घडते. आता नक्की व्हिडिओत काय घडले याविषयी चला सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुण हातात विषारी कोब्रा साप धरून कॅमेरासमोर बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बोलत असताना तरुण अचानक किंग कोब्राचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करू लागते. मात्र यामुळे किंग कोब्रा रागावतो आणि प्रत्युत्तरात तो तरुणावर हल्ला करतो. तरुण कोब्राचे चुंबन घेईल तितक्यात कोब्राच त्याच्या कपाळावर जोरदार दंश करतो. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये माहिती देण्यात आली आहे की हा व्हिडिओ उझबेकिस्तानचा आहे आणि ज्या व्यक्तीच्या कपाळावर साप चावला आहे पण तो आता पूर्णपणे सुरक्षित आहे. दरम्यान तरुणाचा हा कारनामा आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक यातील दृश्ये पाहून आता आवाक् झाले आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @doktorkobra_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 3 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, चव आली का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे यालाच म्हणतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.