(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित काही व्हिडिओजचा देखील समावेश असतो. या व्हिडिओजच्या मदतीने वन्य प्राण्यांचे जीवन आणखीन जवळून पाहता आणि जाणून घेता येते, ज्यामुळे हे व्हिडिओज अधिकतर व्हायरल होतात. लोक फार रुची घेऊन असे व्हिडिओज पाहू लागतात. यात बऱ्याचदा प्राण्यांच्या थरारक शिकारीचे किंवा लढतीचे व्हिडिओ शेअर केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल आला आहे. यातील दृश्ये तुम्हाला हादरवून टाकतील.
तुम्ही आजवर अनेकदा हे ऐकले असेल तर की, झोपलेल्या वाघाला कधीही जागवू नये मात्र असे केलेच तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून तुम्हाला ते समजेल की, हे किती थरारक आणि धोकादायक ठरू शकते. अलीकडेच सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधले आहे, ज्यामध्ये एक वाघ झोपलेला दिसत आहे आणि एक कुत्रा ते पाहून जोरजोरात भुंकायला लागतो. यानंतर सिंह त्याचे जे हाल करतो ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. नक्की व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
हे घटना एका जंगलातील असल्याचे समजत आहे, जिथे एक वाघ आरामात झोपला होता आणि हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा कुत्र्याच्या आवाजाने त्याला त्रास होतो. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कुत्रा भुंकायला लागताच वाघ झोपेतून जागा होतो. यानंतर वाघा क्षणाचाही विलंब करत नाही आणि कुत्र्यावर भयानक हल्ला चढवतो. वाघाचा हल्ला इतका वेगवान होता की कुत्र्याला पळून जाण्याची संधी मिळत नाही. वाघाने त्याला पाहताच त्याला पकडून तो आपली शिकार बनवतो आणि जंगलात ओढत घेऊन जातो. हे दृश्य अतिशय भितीदायक वाटते. श्वानाच्या मृत्यूचा हा थरार पाहून सर्वचजण हादरले, पण जंगलातल्या कोणत्याही वन्य प्राण्यापासून दूर राहायला हवे हा धडाही यातून सर्वांना मिळाला.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @abuzarabbasi00 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘म्हणून आपल्या कामाशी काम ठेवले पाहिजे’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला वाटत त्याला मुद्दाम तिथे सोडण्यात आलं नाहीतर अशा जंगलात कुत्रे सापडत नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आ बैल मुझे मार ही म्हण खरी ठरली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.