Father jumps in sea to save his daughter video goes viral
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर कधी चित्र-विचित्र असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या बाप-लेकीच्या अनोख्या आणि प्रेमळ नात्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वडिल आपल्या मुलीसाठी तिच्या आयुष्यातील पहिला हिरो असतो, तर त्या हिरोच्या आयुष्यातील पहिली राजकुमारी ही त्याची मुलगी असते. सध्या या बाप-लेकीच्या नात्याचा एक प्रेमळ हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने अनेकांचे डोळे पाणवले आहेत. बाप म्हणजे काय हे या उदाहरणावरुन स्पष्ट होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिस्नी क्रूझवर ही घटना घडली आहे. एका बापाने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझवर पाच वर्षाची मुलगी आपल्या वडिलांसोबत असताना अचानक समुद्रात पडते. याच वेळी तिचे वडिल देखील मुलीला वाचवण्यासाठी लगेचच समुद्रात उडी घेतात. तसेच क्रूझवरील बचाव पथक देखील चिमुकलीच्या बचावासाठी कार्य सुरु करतात. पण बाचावकार्य सुरु होण्यापूर्वीच वडिलांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता समुद्रात उडी घेतली. ही घटना डिस्नी ड्रीम शीपवर घडली आहे. हे क्रूझ जहाज दक्षिणकडे फ्लोरिडाच्या दिशेने जात होते. या जहाजावर हजारो लोक सवारी करत होते. यावेळी एक चिमुकली खेळता खेळता समुद्रात पडली. हे पाहताच तिच्या वडिलांनी मुलीला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
NEW: Father jumps overboard to save his 5-year-old daughter, who fell off a Disney cruise ship from the 4th deck into the ocean.
The ship was heading back to South Florida when the intense rescue was made.
“The ship was moving quickly, so quickly, it’s crazy how quickly the… pic.twitter.com/PTGmAzZJ7O
— Collin Rugg (@CollinRugg) June 30, 2025
जहाजावरील प्रत्यक्षदर्शनींच्या मते, जहाज वेगाने फ्लोरिडाच्या दिशेने पुढे सरकत होते. त्या चिमुकलीची आई देखील खूप घाबरलेली होती, ती रडत होती असे प्रत्यक्षदर्शनींना सांगतिले. शिवाय जहाजवरील अनेक लोक मुलीसाठी प्रार्थना देखील करत होते. सध्या या हृदयस्पर्शी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिपच्या क्रू मेंबर्स आणि चिमुकलीच्या वडिलांमुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे. अनेकांनी तिच्या वडिलांचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ एक्सवर @CollinRugg या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ३० जून रोजी ही घटना घडली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.