"मस्ती नही बेटा! जरा दुरसे..." तोंडाजवळ नेताच सापाने सोडली विषारी पिचकारी अन् मग जे घडलं... Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलकीडे सोशल मीडियालर प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंटचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत. सोशल मीडियावर फेम मिळवण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इंडोनेशियातील एक कंटेट क्रिएटरने अतिशय धोकादायक स्टंट केला आहे. यामध्ये या कंटेट क्रिएटरने एका विषारी सापारा हातात पकडले आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवत आहे. मात्र त्याच्यासोबत असे काहीतरी भयानक घडले आहे की यापुढे तो असे करण्याचे धाडस करणार नाही.
सहबत आलम असे या कंटेट क्रिएटरचे नाव आहे. त्याने हातात एक स्पिटींग कोबरा घेतला आहे. याची रिल बनवत असताना या स्पिटींग कोबराने तरुणाच्या डोळ्यात विष टाकले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, इंडिनेशियाच्या या कंटेट क्रिएटरने हातात एक अतिशय विषारी साप पकडला आहे. सापाला पकडून त्याच्याकडे तरुण एकटक पाहत आहे. याच वेळी अचानक फणा बाहेर काढतो आणि तरुणाच्या चेहऱ्यावर विष सोडतो. तरुणाने गॉगल घातलेला असतो यामुळे विष त्याच्या डोळ्यात जास्त जात नाही, परंतु त्याच्या डोळ्याच्या आसपास आणि चेहऱ्यावर पडते. यामुळे तरुणाला तीव्र वेदना आणि जळजळ जाणवते. सध्या हा धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sahabatalamreal या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. अनेकांनी असे धोकादायक स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने, कर अजून हिरोगिरी असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने हा स्पीटींग कोबरा आहे का असा प्रश्न केला आहे. आणखी एकाने गेला की जिंवत आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.