मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा महिलांचा राडा ; एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये मुबंईलच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या लोकलचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. प्रवशांच्या गर्दीसाठी चर्चेत असणाऱ्या या ट्रेनचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कोणी लोकमध्ये रिल्स बनवत असतात, तर कोणी परतीच्या प्रवासात भजन, कीर्तन गात असतात. कधी मुबंईल लोकलमध्ये महिलांच्या हळीदी कुंकवाचाही कार्यक्रम पाहायला मिळतो. सध्या ही लोकल महिलांच्या भांडणांवरुन जास्त चर्चेत येत आहेत.
अलीकडे मुबंईल लोकमध्ये महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नुकताच एक महिलांच्या भांडणाच व्हिडिओ मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिलांनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली लोकलमध्ये पुन्हा एकदा महिलांची हाणारी पाहायला मिळली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी दिसत आहे. याच वेळी दोन महिलांमध्ये अचानक भांडणे सुरु होतात. त्यांचा वाद इतका पेटला आहे की, महिलांनी एकमेकींना मारायला सुरुवात केली आहे. तुम्ही पाहू शकता की,यामध्ये दोन महिलांनी एकमेकींची केस जोरात धरली आहे, एकमेकींना सटासट मारत आहे. काही महिला भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कोणीही ऐकायला तयार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही दिवसापूर्वी देखील असाच एक भांडणाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये एक महिला रक्तबंबाळ देखील झाली होती. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने हे सगळे महाराष्ट्रातील घाणरेड्या राजकारणामुळे घडत असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने मुलगी म्हणजे धोक्याची घंटा असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने अलीकजे अशा घटना रोज पाहायला मिळत असल्याचे म्हटले आहे. जागेवरुन, धक्का लागल्यावरुन लोकलमध्ये भांडणे होत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.