father saves child from flood water taking on head video goes viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे आपल्याला पाहायला मिळत असते. कधी मजेशीर, कधी भयावह, तर कधी चित्र-विचित्र घटनांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच सोशल मीडियावर आपल्याला हृदयस्पर्थी, भावनात्मक व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. अलीकडच्या कलियुगात माणसातील माणूसकी हरवत चालली आहे. येथे कोणालाही कोणाची पर्वा नाही. आपले आई-वडिलांशिवाय कोणीही आपली काळजी करत नाही. आई-वडिल आपल्या मुलांसाठी जगाशा लढायला तयार असतात. सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कलियुगातील वासुदेवाचे दर्शन झाले आहे.
सध्या गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे उत्तर प्रदेशात लोकांच्या दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे लोकांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे लागत आहे. अशातच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पुराच्या पाण्यातून एक कुटुंब वाट काढताना दिसत आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये वडिला आपल्या बाळाला वासुदेवाप्रमाणे डोक्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक नवरा-बायको आपल्या बाळाला घेऊन पुराच्या पाण्यातून जाताना दिसत आहे. बाळाला एका टोपलीत ठेवले असून वडिलांनी त्याला डोक्यावर घेतले आहे. हे कुटुंब हळूहळू पाण्यातून वाट काढत जात आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील छोटा बघाडा परिसरातील आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकजण व्हिडिओ पाहून भावुक झाले आहेत.
आईचं काळीज! पिल्लांसाठी थेट सिगल पक्ष्याशी भिडली ; असं केलं रक्षण, पहा थरारक झुंजीचा VIDEO
आपको द्वापर युग में कृष्ण के जन्म के समय की एक तस्वीर याद होगी जिसमें उफनती यमुना से बचाने के लिए वासुदेव हाथों पर कृष्ण को लेकर जाते हैं
अब कलयुग की ये तस्वीर देखिए जो प्रयागराज से है आपको द्वापर युग की याद दिलवाएगी… pic.twitter.com/UrfLAWeAJ9 — Saurabh (@sauravyadav1133) August 3, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sauravyadav1133 या अकाउटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. यावर अनेकांनी द्वापर युगातील बाळ कृष्णाला घेऊन जाणाऱ्या वासुदेवाची आठवण झाल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशाच्या बघाड परिसरात मदत न पोहोचल्याने कुटुंबाला पूराच्या पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे.
क्षणात डाव पलटला! सिंहाने म्हशीवर घातली झडप पण स्वत:च झाला शिकार ; थरारक झुजींचा Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.