आईचं काळीज! पिल्लांसाठी थेट सिगल पक्ष्याशी भिडली ; असं केलं रक्षण, पहा थरारक झुंजीचा VIDEO (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर कधी मजेशीर, कधी भयावह असे स्टंटचे, जुगाडाचे, डान्सचे रिल्स, भांडणाचे असे भन्नाट व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. यामध्ये तुम्ही जंगली प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. रोज वाघ, सिंह, साप, गरुड, घार, बदक, माकड यांसारख्या अनेक प्राण्यांचे शिकार करतानाचे असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक हंसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी ही हंसीणी थेट एका सिगल पक्ष्याला भिडली आहे.
असे म्हणतात आई आपल्या मुलांचे सर्व गोष्टींपासून रक्षण करते. प्रत्येक संकटापासून आपल्या मुलांना वाचवते, वेळ पडली तर स्वत:चा जीव देखील धोक्यात घालायला कोणताही विचार करत नाही. पण हे दृश्य केवळ मनुष्यामध्ये पाहायला मिळत नाही, तर पशु-पक्ष्यांमध्ये देखील पाहायला मिळते. असाचा काहीसा हा व्हिडिओ आहे. यामध्ये एका हंसने आपल्या पिल्लांना खायला आलेल्या सिगल पक्षाला चांगलाच धडा शिकवला आहे. तुम्हाला माहिती असले काही पक्षी हे किटक, मासे, छोटे छोटे किंडे-मुंग्या खाणारे असतात. वेळ पडल्यास हे पक्षी दुसऱ्या पक्ष्याच्या पिल्लांना देखील खाताता. यामध्ये सिगल पक्षी देखील प्राण्यांची शिकार करतो.
या व्हिडिओमध्ये देखील सिगल पक्षी हंसीणीच्या पिल्लांना खायला आला होता. तुम्ही पाहू शकता की, सिगलने पिल्लांवर झडप घातली आहे, पण इतक्या पिल्लांच्या आईने त्याला चोचीने बाजूला ओढले असून त्याच्यावर वार केला आहे. तुम्ही पाहू शकता की, सिगल पक्षला हंस चोचीने सतत मारत आहे. सिगल पक्षी आपला जीव वाचवण्यासाठी तडफडत आहे. पण हंस मात्र त्याला चोचीने मारुन मारुन तिथून पळवून लावते. तिथेच तिची पिल्लं देखील हे सर्व दृश्य पाहत असतात.
क्षणात डाव पलटला! सिंहाने म्हशीवर घातली झडप पण स्वत:च झाला शिकार ; थरराक झुजींचा Video Viral
A mother swan trying to keep her baby safe from a hungry seagull. pic.twitter.com/WtiyKTEB7P — Moments that Matter (@_fluxfeeds) July 30, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @_fluxfeeds या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. एका युजरने, हे अविश्वसनीय आहे. आई हंसने सिगल पक्ष्याला चांगलाच धडा शिकवला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने एक कणखर आई असे म्हटले आहे. अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.