क्षणात डाव पलटला! सिंहाने म्हशीवर घातली झडप पण स्वत:च झाला शिकार ; थरराक झुजींचा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया))
सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी भयावह असे स्टंटचे, जुगाडाचे, डान्सचे रिल्स, भांडणाचे असे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर अलीकडे जंगली प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. रोज वाघ, सिंह, साप, गरुड, घार यांसारख्या अनेक प्राण्यांचे शिकार करतानाचे, शिकारीचा आनंद लुटतानाचे व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक सिंहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सिंह एका म्हशीची शिकार करण्यासाठी गेला आहे, परंतु पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही.
कारण सिंह हा जंगलाचा राजा आहे. सिंहाच्या तावडीत सापडल्यास सुटका होणे अगदी अशक्यच आहे. परंतु अनेकदा नशीब पालटते. तुम्ही शिकारीच शिकार होताना अनेकदा पाहिले असेल. असेच काहीसे या सिंहासोबत इथे घडले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पाण्याचे तळ दिसत आहे. यामध्ये एक म्हैस दिसत आहे. तसेच इथेच एक सिंह दिसत आहे. सिंहाने म्हशीवर झडप घातली आहे. म्हशीच्या पायाचा चावा सिंह घेत आहे. म्हैस आपल्या जीव वाचवण्यासाठी आपला पाय ओढत आहे. जोराजोरात ओरडत आहे. पण सिंहाची पकड खूप मजबूत आहे. इतक्यात सिंह अचानक म्हशीला सोडून बाजूला होतो आणि तिथून पळ काढतो. कारण दुसऱ्या बाजूने म्हशींचा कळप येतो. तुम्ही पाहू शकता की, म्हैस आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, ओरडत आहे. कदाचित तिचा आवाज ऐकूनच म्हशींचा कळप तिथे आला असावा.
व्हायरल व्हिडिओ
pic.twitter.com/pMDXlkcRvD — Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) July 29, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या अद्भुत झुंजीची व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंडे वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TheeDarkCircle या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अलीकडे सोशल मीडियावर जंगालातील असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.