नादच खुळा! RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा (Photo Credit- X)
काल संध्याकाळी पार पडलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 250 धावांचा डोंगर उभा केला होता. चेन्नईसमोर विजयासाठी 251 धावांचे कठीण लक्ष्य होते, मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ अपयशी ठरला. आरसीबीने 43 धावांनी विजय साजरा करताच संपूर्ण चिन्नास्वामी स्टेडियम ‘आरसीबी-आरसीबी’च्या घोषणांनी दणाणून गेले. सोशल मीडियावरही आरसीबीच्या चाहत्यांनी सीएसकेच्या चाहत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
😭??
pic.twitter.com/Z6quocJ7kQ — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 5, 2026
सोशल मीडियावर सध्या जो व्हिडिओ चर्चेत आहे, तो स्टेडियममधील स्टँडमध्ये बसलेल्या दोन चाहत्यांचा आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घालून शांत बसलेला दिसत आहे. त्याच्याच शेजारी आरसीबीची एक महिला चाहती उभी आहे. आरसीबीचा विजय जवळ येताच ही तरुणी त्या तरुणासमोर पाहून जोरजोरात हूटिंग करताना आणि जल्लोष करताना दिसत आहे. बिचारा चेन्नईचा चाहता या हूटिंगमुळे काहीसा अवघडलेला दिसतोय. तो हाताने खुणावत तिला “ठीक आहे, आता शांत बस” असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण आरसीबीची चाहती मात्र भलतीच फॉर्मात दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. बातमी मिळेपर्यंत हा व्हिडिओ 50 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत: “हे चुकीचे आहे, विनाकारण कोणाला तरी असं डिवचू नका.”एकंदरीत, मैदानावरील विजयाइतकीच चर्चा आता मैदानाबाहेरील या चाहत्यांच्या ‘राडा’ होताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे आयपीएलमधील चाहत्यांमधील स्पर्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.






