foreign woman visit rural village school left children scared
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही परदेशी लोकांचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या एका परदेशी महिलेचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक परदेशी महिला गावातील एका शाळेत गेली होती. पण तिला पाहून मुले रडत सैरावैरा पळू लागली आहेत. तसेच तर आता भारतात एखादी परदेशी व्यक्ती दिसणे सामान्य झाले आहे. पण गावाकडे असे दृश्य क्वचित पाहायला मिळते. यामुळे मुलांना परदेशी लोक कसे दिसतात याची फारसी कल्पाना नसेत.
कदाचित यामुळे ही महिला खेडागावीतल शाळेत गेल्यावर मुलांना भीती वाटली असेल. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लाओमधील एका खेड्यातील शाळेमध्ये ही महिला गेली होती. यावेळी मुलांना तिला पाहू रडायला सुरुवात केली. मुले सैरावैरा पळून वर्गात बॅंच खाली लपून बसील. हे सर्वा पाहून या परदेशी महिलेलाही धक्का बसला होता. मुले भूत आलं, भूत आलं म्हणूनही ओरडु लागली होती.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मुलांच्या निरागसतेचा आनंद लुटला आहे. व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @infobazzarnet या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला प्रतिक्रिया देताना एका युजरने आजचा सगळ्यात मजेशीर व्हिडिओ, तर दुसऱ्या एकाने पोरांना मोठं झाल्यावर याचा पश्चाताप होईल असे म्हटले आहे. आणखी एकाने त्यांना इतिहास माहित आहे असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी यावर हसण्याचे इमोजीही शेअर केले आहेत. ही घटना त्या परदेशी महिलेच्या नक्कीच आयुष्यभर लक्षात राहिल असे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.