(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे आणि आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेकदा अशा काही दुर्लभ गोष्टीही शेअर केल्या जातात ज्या आपण याआधी कधीही पहिल्या नसतील. अशीच एक घटना आता इथे शेअर करण्यात आली आहे जिने सर्वांनाच थक्क करून सोडले आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात मंदिराच्या शिखरावर चिमुकला पांढरा घुबड विराजमान झाल्याचे दिसून आले. ‘श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्व भूषण मिश्रा यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून शेअर केले असून ते आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
फोटो पोस्ट करताना मंदिर ट्रस्टच्या सीईओने लिहिले की, ‘आता पुन्हा एकदा (छायाचित्र – श्री काशी विश्वनाथ धाम अधिकृत छायाचित्रकार) असे दिसते की काहीतरी खूप शुभ घडण्याची वाट पाहत आहे. आज पुन्हा एकदा शिखराच्या शिखरावर पांढरे घुबड दिसले’. सोन्याने मढलेल्या मंदिराच्या शिखरावर बसलेला हा सफेद घुबड मंदिराची शान आणखीन वाढवत होतात. शुभ्र रंगाचे शरीर अन् इवलेसे गडद काळे डोळे… त्याचे हे दृश्य मंदिराच्या शिखराची शान आणखीन वाढवत होते.
रिपोर्टनुसार , सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास, कुठूनतरी एक पांढरे घुबड आले आणि सोनेरी शिखरावर बसले. तथापि, सकाळी ते त्याच्या जागी दिसले नाही. आता ते बाबांच्या आरतीचे नियमित भक्त बनले आहे, जे बहुतेकदा आरती दरम्यान दिसते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. यासोबतच, जर घुबडाचा रंग पांढरा असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे एकंदरीतच आता हे दृश्य धार्मिक श्रद्धेशी जोडले जात आहे.
हा फोटो @vishwarajbhushan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जय बाबा विश्वनाथ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला माहित नाही कोणाला कळतंय की नाही पण जेव्हा मी तिथे मंगला आरतीला गेलो होतो… वर खूप उंदीर होते आणि शांत बसले होते…”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.