खाली खोल दरी आणि झाडाच्या पातळ खोडावर नाचू लागली तरुणी; तोल जणार तितक्यात... पाहूनच उडतील होश; Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले जातात. यातील बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी लोक अनेक नको नको ते प्रकार करू पाहतात, कधी कोणी विचित्र स्टंट्स करतात, कधी डान्स तर कधी जुगाड… हे व्हिडिओज नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडचे असतात आणि आपल्याला थक्क करून जातात. आताही इथे असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका महिला आपला जीव धोक्यात घालून रील बनवताना दिसून आली. एका रीलसाठी तरुणी झाडाच्या पातळ खोडाच्या टोकावर चढते आणि मोठ्या जोशात डान्स करू लागते. तिचा हा डान्स पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो कारण यावेळी तिच्या खाली खोल दरी असते. व्हिडिओत पुढे काय घडले ते चला जाणून घेऊया.
आत्मविश्वास असावा पण इतका नसावा, सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील दृश्ये तुमच्या अंगाचा थरकाप उडवतील. यात एक तरुणी स्टंट करत झाडाच्या टोकावर चढून डान्स करताना दिसून आली. तिच्या या डान्सने सर्वच अचंबित झाले. मुख्य म्हणजे, इतक्या धोकादायक ठिकाणी डान्स करूनही तिच्या चेहऱ्यावर भीतीची एक रेघही दिसत नाही. मुलगी आपल्या जीवाची पर्वा न करता झाडाच्या सर्वात उंच फांदीवर जाऊन उभी राहते आणि मनसोक्त डान्स करू लागते. व्हिडिओमध्ये तरुणीचा काही काही ठिकाणी तोल देखील जातो मात्र ती कशीबशी स्वतःला सावरते आणि हे संपूर्ण दृश्य युजर्सना आश्चर्यचकित करते. तरुणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लोकांद्वारे मोठ्या प्रमाणात या व्हिडिओला शेअर केले जात आहे.
Damn😭🫡 pic.twitter.com/OIbjKbhaQH
— rareindianclips (@rareindianclips) May 18, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @rareindianclips नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, नक्की या ताईंना काय हवं आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “थोडं विष आणा, मला आता जगायचं नाहीये, मी ते पाहिलं आहे जे मी कल्पनाही करू शकत नव्हतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिच्या धाडसाला मानले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.