Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! गुगल मॅप फाॅलो करणं पडलं महागात, रस्ता शोधत शोधत महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर चढवली चारचाकी; Video Viral

Car On Railway Track : महिलेने मॅप बघत गाडी चालवण्याचे ठरवले पण यानंतर जे घडले त्याने सर्वांनाच अवाक् करुन सोडले. नकाशा बघत बघत गाडी थेट रेल्वे ट्रॅकवर जाऊन पोहचली. मुख्य म्हणजे महिलेने इथेच गाडी थांबवली नाही तर ४०० मीचरपर्यंत ती रेल्वे ट्रॅकवर चारचाकी चालवत राहिली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2026 | 11:11 AM
अरे बापरे! गुगल मॅप फाॅलो करणं पडलं महागात, रस्ता शोधत शोधत महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर चढवली चारचाकी; Video Viral

अरे बापरे! गुगल मॅप फाॅलो करणं पडलं महागात, रस्ता शोधत शोधत महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर चढवली चारचाकी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • नेव्हिगेशनवर पूर्णपणे अवलंबून राहिल्याने एका प्रवासादरम्यान अनपेक्षित गोंधळ निर्माण झाला.
  • चुकीचा मार्ग आणि क्षणिक संभ्रमामुळे वाहतूक व्यवस्थेला काही काळ अडथळ्यांचा सामना करावा लागला.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
रस्ते माहिती नसले की ते शोधण्यासाठी आधुनिक काळात गुगल मॅपचा भरपूर वापर केला जातो. या ॲपवर आपले आताचे लोकेशन आणि आपल्याला जिथे जायचे आहे तिथले लोकेशन टाकताच ॲप आपल्याला संपूर्ण मार्गाचा नकाशा दाखवतो. यावर एक नॅव्हिगेटर देखील आहे जो आपल्याला कसं आणि कोणत्या रस्त्यावरुन जावं याची वेळोवेळी माहिती देत राहतो. तथापि मागील काही काळापासून गुगल मॅपमुळे अनेक समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. चुकीची माहिती दिल्यामुळे अनेक लोक गंतव्यस्थानाऐवजी दुसऱ्याच ठिकाणी जाऊन पोहचली तर काही प्रकरणात लोकांचा अपघात घडून आल्याचीही माहिती समोर आली.

बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral

याच पार्श्वभूमीवर आता सोशल मडियावर आणखी एक घटना समोर आली आहे, ज्यात महिलेने गुगल मॅपचा वापर करुन कारला रेल्वे ट्रॅकवर चढवल्याचे धक्कादायक दृष्य दिसून आले. ही घटना अमेरिकेच्या सियाटलमध्ये घडून आल्याची माहिती आहे. झालं असं की, ७० वर्षीय महिला GPS चा वापर करत आपल्या कारमधून गंतव्यस्थानापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होती. पण GPS ने तिला भलताच रस्ता दाखवला ज्यामुळे ती कार घेऊन रेल्वे ट्रॅकवर घुसली. मुख्य म्हणजे यानंतरही तिने आपली गाडी मागे घेतली नाही तर GPS ला फाॅलो करत ती साधारण ४०० मीटरपर्यंत आपली चारचाकी रेल्वे ट्रॅकवर चालवत राहिली. शेवटी माउंट बेकर नावाच्या स्टेशनवर जाऊन तिच्या गाडीला थांबवण्यात आले.

व्हायरल व्हिडिओ

या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक लाल रंगाची चारचाकी रेल्वे ट्रॅकवर चालत आहे. रेल्वे स्थानकावर फार वर्दळ नसल्याने कुणीही या गोष्टीची दखल घेतली नाही. परंतु रेल्वेच्या एका स्टाफने जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा त्याने धावत-पळत येऊन महिलेला गाडीतून उतरण्यास सांगितले. महिला यानंतर बाहेर आली आणि तिने काय घडलं याची माहिती दिली. सांगितलं जातंय की, या घटनेमुळे शहरातील लाईन १ ची लाईट रेल सेवा सुमारे दोन तासांसाठी स्थगित करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन टीमने कारला ट्रॅकवरुन हटवले आणि यानंतर रेल्वे सुरु करण्यात आली.

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

रिपोर्ट्सनुसार, महिला जेव्हा आपल्या गाडीतून जात होती तेव्हा तिच्यासमोर एक रस्ता आला जो काहीसा रेल्वे ट्रॅकसारखा दिसत होता. अशात जेव्हा तिची गाडी खरोखरच्या रेल्वे ट्रॅकवर आली तेव्हा ती गोंधळून गेली आणि तिने यालाही रस्ता समजून त्यावर आपली गाडी चढवली. पोलिसांनी सांगितले की, महिला नशेत होती आणि ती फार गोंधळलेली दिसत होती.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Google maps navigation error woman drives car on railway track in seattle video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • America
  • GPS
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

War Alert: खाडीतील तणावाने गाठला धोक्याचा टप्पा; होर्मुझमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये चकमक, अमेरिकेने उडवले इराणचे रडार केंद्र
1

War Alert: खाडीतील तणावाने गाठला धोक्याचा टप्पा; होर्मुझमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये चकमक, अमेरिकेने उडवले इराणचे रडार केंद्र

बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral
2

बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ
3

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral
4

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.