(फोटो सौजन्य: X)
दुर्दैवाने, भारतात आलेल्या काही विदेशी पर्यटकांना, विशेषतः महिलांना, काही असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरवर्तनाचा सामना करावा लागतो. अशा घटना केवळ संबंधित व्यक्तीची प्रतिमा खराब करत नाहीत, तर परदेशी पर्यटकांच्या मनात संपूर्ण देशाबद्दल नकारात्मक आणि भीतीदायक चित्र निर्माण करतात. याच पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर एक नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात भारतात फिरायला आलेल्या महिला पर्यटकासोबत काही व्यक्तींनी चुकीचे वर्तन केल्याचे उघडकीस आले. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यूजर्सद्वारे घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ फक्त ३६ सेकंदाचा असला तरी यातील दृष्ये कुणाचाही राग अनावर करण्यास पुरेशी आहेत. व्हिडिओमध्ये विदेशी पर्यटक गजबजलेल्या रस्त्यावरून चालताना दिसतात. लाल टी-शर्ट घातलेला एक तरुण हसत हसत पुढे येतो आणि लगेच मागे वळतो. टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेले आणखी दोन तरुण दुसऱ्या बाजूने येतात. त्यानंतर, पांढरा टी-शर्ट घातलेला एक तरुण पुढे येतो आणि त्याच्या समोरून चालणाऱ्या एका परदेशी महिला पर्यटकाला स्पर्श करुन पुढे निघून जातो. आपल्यासोबत चुकीचे झाले आहे हे समजताच पर्यटक मान वळवते पण व्यक्ती पुढे निघून गेल्याने तिला काहीच करता येत नाही. या व्हिडिओतून स्पष्ट होते की, देशात महिला रात्रीच काय तर दिवसाढवळाही अशा लांडग्यांपासून सुरक्षित नाहीत. ही घटना ४ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
These guys need serious kutai fr😡 https://t.co/6IZhpXw962 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 4, 2026
दरम्यान घटनेचे सीसीटिव्ही फुटेज @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘यांना खरंच चांगला चोप दिला पाहिजे’. व्हिडिओला लाखो यूजर्सने पाहिलं असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “ते ज्या ठिकाणाहून येतात, तिथे अशा गोष्टी कदाचित नित्याच्याच असतील. केवळ अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण न ठेवल्यामुळे भारताचे पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांना पृथ्वीवर राहण्याचा अधिकार नाही, त्यांचा नायनाट केला पाहिजे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मी हे नक्की काय पाहिलं? त्यांना काठ्यांनी बडवलं पाहिजे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






