(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते, यात हाॅटेलच्या खोलीत हाय-व्होल्टेज ड्रामा सुरु असल्याचे दिसते. पत्नी आपल्या पतीला हाॅटेलमध्ये तरुणीसोबत रंगेहात पकडते ज्यानंतर तिचा राग अनावर होतो. व्हिडिओमध्ये पत्नी तरुणीला मारहाण करत असते. तरुणीचे केस खुले असतात तर संतापलेली पत्नी तिला एका मागून एक कानशिलात बडवत असते. संधी पाहून तरुणी देखाल तिला चपलेने मारते ज्यानंतर वाद आणखी चिघळतो.
व्हिडिओमध्ये दिसून येणारी तरुणी काॅलेजच्या गणवेशात असते ज्यामुळे घटनेविषयीची चिंता आणखी वाढली. व्हिडिओमध्ये लोकांचा जमाव देखील दिसतो जे नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी खोलीबाहेर आलेले असतात. यातीलच एकाने घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि नंतर इंटरनेटवर त्याला शेअर केले. तथापि, कोणाचीही ओळख किंवा या संपूर्ण घटनेचे खरे स्वरूप याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
Rajasthan Shock: Sarpanch Caught in Hotel With Young Woman, Wife Creates Scene #rajasthannews #sarpanch #extramaritalaffair #viralvideo pic.twitter.com/UnTSrBb67H — Savera Times Himachal (@Savera_HP) June 5, 2026
या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफाॅर्म्सवर शेअर करण्यात आला आहे. मुलीचे वय कमी असल्याने व्यक्तीच्या कृत्यावर आता संताप व्यक्त केला जात आहे. काहींनी याला लाजीरवाणे म्हटले आहे तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचा गोंधळ आणि हिंसाचाराच्या योग्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की तुम्ही केलेली चूक फार काळ जगापासून लपली जाऊ शकत नाही. इंटरनेटच्या जगात तुमची पर्सनल गोष्ट ही कधी सार्वजनिक होईल याची शाश्वती नाही त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणे गरजेचे आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






