
grandson takes grandparents to dubai in first ever flight video viral
असे म्हणतात आजी-आजोबा आणि नातावाचे नातं हे अत्यंत खास असते. या नात्यात वेगळीच आपुलकी, गोडवा, प्रेम अनुभवायला मिळता. नातू हा आजी-आजोबांचा उतारत्या वयात मोठा आधार असतो. पण अलीकडच्या स्वार्थी दुनियेत लोक आपल्या आई-वडिलांना देखील संभाळत नाही, मग आजी-आजोबा दूरच राहिले. परंतु व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने आजी-आजोबा आणि नातावाच्या नात्याचा एक खास असा प्रत्यय आला आहे. एका नातू आपल्या वडिलधाऱ्यांना घेऊन दुबईला गेला आहे. आजी-आजोबांनी पहिल्यांदाच विमानाने प्रवास घडवली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की आजींच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भिती आणि उत्सुकता पाहयला मिळत आहे. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ankitranabigmouth या अकाउंटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कौतुकंचा वर्षाव केला आहे, एकाने नातू असावा तर असा असे म्हटले आहे. तर एकाने अशी नाती जपता आली पाहिजेचत असे म्हटले आहे. काहींनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.