(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील तेनाली शहरातील एका कुटुंबाने साजरी केलेली संक्रात सध्या चांगलीच चर्चेत आहे. संक्रांतीच्या निमित्ताने कुटुंबाने आपल्या जावयाला जेवणाचे आमंत्रण केले होते. या मेजवाणीत त्यांनी बोटावर मोजण्याइतके नाही तर 158 पदार्थांना सामील केले जो एक विक्रमी आकडा आहे. माहितीनुसार, वंदनपु मुरलीकृष्ण आणि त्यांच्या पत्नीने त्यांची मुलगी मौनिका आणि जावई श्रीदत्त यांना खास आमंत्रण केले होते. आंध्र प्रदेशात, पहिल्या संक्रांतीला विशेष महत्त्व असते, विशेषतः जेव्हा जावई पहिल्यांदाच त्याच्या सासरच्या घरी येतो. हा आदर, आपुलकी आणि प्रेम दाखवण्याचा एक प्रसंग मानला जातो.
पारंपारिक संक्रांत भव्य मेजवाणीने केली जावी यासाठी त्यांनी 158 पदार्थांना यात सामील केले. यात मुरुक्कू, चेक्कलू आणि केलेलू यांसारखे चविष्ट पदार्थ तर अरिकेलू, बोब्बटलू, सुन्नुंडालू आणि काज्जिकायलू सारखे काही गुळावर आधारित पदार्थ सामील होते. विविध प्रकारचे भाताचे पदार्थ, मसालेदार करी, भाज्या आणि विविध प्रकारचे साइड डिश देखील यात ठेवण्यात आले होते. मेजवाणीत व्हेज आणि नाॅनव्हेज अशा दोन्ही पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. या अनोख्या आणि भव्य मेजवाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करतात यातील इतक्या डिशेस पाहून नेटकरी थक्क झाले.
आंध्र प्रदेश के एक परिवार ने अपने दामाद को पहली संक्रांति के अवसर पर 158 व्यंजन परोसे। pic.twitter.com/C3mW02otox — Arjun Chaudharyy (@Arjun5chaudhary) January 15, 2026
याचा व्हिडिओ @Arjun5chaudhary नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आदरातिथ्य असावं तर असं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही फक्त मेजवाणी नाही तर त्यांचं प्रेम आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असे आदरातिथ्य आपल्याला फक्त भारतातच पाहायला मिळू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






