
Groom Kiss Bride in Spider Man Style Video Viral
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण-तरुणी स्टेजवर लग्नाते वचन घेत आहेत. नवरीने पांढऱ्या रंगाचा अतिशय सुंदर असा वेडिंग गाऊन घातला आहे. तिच्या हातात फुलांचा एक बुके आहे. तसेच नवरा देखील सुट-बुट घालून तयार झालेला आहे. दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन घेतल्यानंतर स्टेजवरुन खाली उतरतून येतात. यावेळी हवेतून एक दोरी लटकत असते. नवरा दोरीपाशी येताच त्याला पकडून उलटा होता आणि तसेच नवरी त्याला किस करते. हे दृश्य स्पायडरमॅन चित्रपटातील आहे. नवरीच्या इच्छेखातर नवऱ्याने अशा अनोख्या स्टाईलमध्ये आपले प्रेम व्यक्त केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @nationalbuzzofficial या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, किती क्यूट आणि हार्टचा इमोजी शेअर केला आहे. अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहे. दुसऱ्याने एक स्पायडरमॅनचे गिफ शेअर केले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.