माणुसकी अजूनही जिवंत आहे! तारेत अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती क्रेनला लटकलेला दिसत आहे. हा व्हिडिओ तिथेच असलेल्या खांबाच्या तारेवर अडकलेल्या पक्षाला वाचवताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, पक्षी तिथून निसटण्यासाठी फडफड करत आहे. जीवाच्या आकांताने सुटकेसाठी उडण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून तरुणाने निष्पाप जीवाला वाचवण्यासाठी धाव घेतली आहे. तरुण थेट क्रेनला लटकला आहे. त्याने हातात एक कात्री घेतली असून तो तार कापण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन पक्षी तिथून आझाद होईल आणि उंची भरारी घेऊ शकेल. काही मिनिटांचा प्रयत्नानंतर तरुण यामध्ये यशस्वी झाला आहे. पक्ष्याने जीव मोकळा होताचा हवेत उंच भरारी घेतली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
📍Punjab | Viral video shows man hanging from a crane to rescue bird entangled in wires. pic.twitter.com/bYXLSlpp3e — The Tatva (@thetatvaindia) January 6, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅफॉर्म एक्सवर @thetatvaindia या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर तरुणाचे कौतुक केले आहे. प्राणीप्रेमींना तर हा व्हिडिओ अत्यंत आवडला आहे. तरुणाचे नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक केले जात आहे. पुन्हा एकदा लोकांचा माणुसकी जिवंत असल्यावर विश्वास बसला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही देखील तरुणाचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






