(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
ही घटना कोटाच्या बोरखेडा भागातील प्रताप नगर येथे घडून आली. चोराने ज्या घराला लक्ष्य बनवले होते त्या घरचे लोक खाटू श्यामच्या दर्शनासाठी बाहेर गेले होते. जेव्हा कुलुप खोलून ते घरात गेले तेव्हा त्यांना चोरी करण्यासाठी आलेला चोर घराच्या एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकल्याचे दिसून आले. महिलेने हे दृश्य पाहताच आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकताच शेजारी आणि आजूबाजूचे लोक जमले आणि त्यांनी चोराला घेरले. पोलिसांना बोलावण्यात आले ज्यानंतर अनेक प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी चोराला पंख्याच्या छिद्रातून बाहेर काढले आणि त्याला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून चोराची गाडीही जप्त केली आहे, ज्यावर पोलिस स्टिकर लावलेले आहे. आता बोरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरासोबत घडलेली ही घटना फारच मजेशीर असून याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
In Rajasthan’s Kota, a family returned from Khatu Shyam Ji darshan to find a thief stuck in the exhaust fan hole! They called police to pull him out. Accused Pawan drives a police officer’s car. 😳
pic.twitter.com/mwNcxjD2AF — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 6, 2026
या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाने जाण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जगातील सर्वात मूर्ख चोर! त्याला जाऊ द्या, त्याने त्याच्या गुन्ह्यापेक्षा कितीतरी पट जास्त ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते दर्शनासाठी गेले आणि हे पाहण्यासाठी परत आले, भक्तीने मदत केली की भौतिकशास्त्राने? असो, क्राइम थ्रिलरचा शेवट कॉमेडी शो म्हणून झाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






