groom was locked up for not giving 50 thousand to sister-in-law for shoe wedding traditions in uttar pradesh marrige viral news
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. लग्न समारंभाचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा लग्नात अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवरुन गोंधळ उडतो. तसेच वादही होतात. आत्याला साडीच दिली, मावशीला सोन्याचं पाटलं केलं किंवा मुलीकडच्यांनी काहीच दिलं नाही अशा प्रकराच्या लहान सहान गोष्टींवरुन वाद होत असतात. शिवाय, लग्नात अनेक मंडळी नवरा-नवरीसोबत गमती-जमती करतात. यामध्ये एक विशेष रसम असते. ती म्हणजे नवऱ्याचे बूट चोरण्याची. यामध्ये नवरीकडेच नवऱ्या मुलाचे बूट चोरी करतात आणि त्या बदल्यात कोणी गिफ्ट घेतं किंवा पैसे घेतो.
परंतु उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील एका ल्गनसमारंभात काही भलतचं घडलं आहे. बूट चोरण्यावरुन एवढे मोठे प्रकरण घडले आहे की, प्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेलं आहे आणि पोलिसही यामुळे हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्यामुलाचे बूट चोरल्यानंतर मेव्हणीने दाजींकडे 50 हजार रुपये मागितले. मात्र दाजींनी हात अखडता घेत केवळ पात हजार रुपये दिलं. यावरुन मेव्हणी नाराज झाली. यानंतर असे काही घडले की यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. ही मस्करी इतकी वाढली की याचे हाणामारीत रुपांतर झाले.
देहरादूनवरुन मोहम्मद साबिर वरात घेऊन बिजनोर गढमलपूरला गेला होता. सर्व काही आनंदात सुरु होते. दरम्यान नवरदेवाचे बूट चोरण्याच्या प्रथेमध्ये वादाची ठिणगी पडली. मेव्हणीने 50 हजार रुपये बूट परत करण्याच्या बदल्यात मागितले. नवरदेवानेही हट्ट धरत केवळ पाच हजार रुपये घ्या नाहीतर बूट ठेवा असे म्हटले. यामुळे हा वाद वाढत गेला.नवरीकडच्यांनी नवऱ्याला भिकारी म्हटले.नवरदेव आणि नातेवाईकांना नवरीच्या कुटुंबीयांनी खोलीत बांधून ठेवले. या घटनेनंतर नवऱ्याने नवरीला घेउन जण्यासही नकार दिला. नवऱ्याने सोशल मीडियावर घडलेल्या प्रकरणाचा व्हिडिओ शेअर केला. ही सर्व घटना पोलिसांपर्यंत गेली. पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या लोकांना स्टेशनला आणले. तिथे वाद सामंजस्याने सोडवण्यात आला.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
साली की जूता चुराई का शिकार दुल्हा!#बिजनौर में आज देहरादून से दूल्हा साबिर दुल्हन को ब्याहने आया था. साली ने जूता चुराई का नेग ₹50 हजार मांगा. दूल्हे ने मोलतोल के बाद सिर्फ ₹5 हजार रुपए दिए
तभी किसी ने दूल्हे को “भिखारी” कह दिया. दूल्हे मियां नाराज हो गए. दुल्हन को साथ ले… pic.twitter.com/pNM83eXhGl
— Narendra Pratap (@hindipatrakar) April 6, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @hindipatrakar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी काय प्रकार आहे बाई असे म्हटले आहे. काहींनी नवऱ्याची बाजू घेतली आहे तर काहींनी नवरीकडच्यांची बाजू घेतली आहे. तर काहींना या प्रकरणात नवरीला कोणी काही विचारले असे म्हटले आहे सध्या हा व्हिडिओ मठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.