दुसऱ्या मुलीबरोबर पाहून गर्लफ्रेंडने दिला बॉयफ्रेंडला चोप (फोटो सौजन्य - X.com)
आजकाल विश्वास हा शब्द नात्यात राहिलाच नाहीये. स्पेशली Gen Z पिढीला तर प्रेम या शब्दाचा अर्थही कळत नाहीये. इतकंच नाही तर लग्नानंतरची Extra Marital Affairs वाढली असून धडाधडा खूनही होताना दिसून येत आहेत. त्यामुळे नात्यात विश्वासघात करताना पकडलं जाणं हे आता नवं राहिलेलं नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसून येत आहे.
हा ड्रामा इतका चालला की गर्लफ्रेंडने दुसऱ्या मुलीसह पकडल्यावर तिथेच आपल्या बॉयफ्रेंडला जबरदस्त चोपला आहे. सोशल मीडियावर आता या व्हिडिओवर जबरदस्त कमेंट्स येतानाही दिसत आहेत. मैत्रिणीनेच व्हिडिओ काढून हा व्हायरल केल्याने आता नक्की काय बोलायचं हादेखील प्रश्न आहे (फोटो सौजन्य – Instagram)
अलिकडेच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी तिच्या प्रियकराला रंगेहाथ फसवताना पकडते. एवढेच नाही तर ती त्याला जागीच मारहाणदेखील करते. हा संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो आता व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की एक मुलगा एका मुलीसोबत कॅफेमध्ये आला आहे. त्यांना पाहून असे वाटते की जणू ते दोघे एकत्र डेटवर आले आहेत. दरम्यान, त्या मुलाची प्रेयसी घटनास्थळी पोहोचते आणि दोघांनाही रंगेहाथ पकडते. मुलगा त्याच्या प्रेयसीला पाहून थक्क होतो आणि पुढे दोघेही भयानक भांडू लागतात.
पहिली गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसह पाहून रागात त्या मुलाला जोरात थोबाडीत मारताना दिसत आहे आणि वारंवार विचारते की ही मुलगी कोण आहे आणि तू तिच्यासोबत काय करत आहेस? दरम्यान दुसरी मुलगी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. पण प्रेयसीचा राग शिगेला पोहोचतो आणि ती मुलाला वारंवार थप्पड मारत राहते असे या व्हिडिओतून दिसून आले आहे.
इतकंच नाही तर प्रेयसी तिच्या एका मैत्रिणीला सोबत घेऊन आली आहे जिने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि आता हा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एका पेजने X वर शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया
व्हिडिओवर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, ‘मुलीने मुलाला पकडण्यासाठी किती छान प्लॅन केला.’ दुसऱ्याने म्हटले, ‘खूप छान केले, अशा लोकांना मारहाणच करायला हवी.’ तिसऱ्याने लिहिले, ‘आपल्यासाठी एक मिळवणे कठीण आहे आणि भाऊ दोघांसोबत फिरत आहे.’ कोणीतरी म्हटले, ‘याला म्हणतात धमाकेदार डेट’
Kalesh over Girlfriend caught his Boyfriend went on a Date with Other girl
pic.twitter.com/ENkT1qxa2e— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 14, 2025
ना लाईफ की फिकर, ना पानी का डर…! रिलसाठी जोडप्यानं कालव्यात उडी मारली अन्…; भयावह Video Viral