Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा तर फिल्मी सीन! घटस्फोटाच्या सुनावणीपूर्वीच कोर्टाबाहेर नवरा-बायकोचं पुनर्मिलन, एकमेकांना मिठी मारली अन्… घटनेचा Video चर्चेत

Husband-Wife Path-Up : पतीच्या एका कृतीने पत्नीचं अस मन जिंकल की तिने कोर्टाबाहेरच घटस्फोटाचे कागद फाडले. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि नव्याने आयुष्याची पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 13, 2026 | 10:47 AM
हा तर फिल्मी सीन! घटस्फोटाच्या सुनावणीपूर्वीच कोर्टाबाहेर नवरा-बायकोचं पुनर्मिलन, एकमेकांना मिठी मारली अन्... घटनेचा Video चर्चेत

हा तर फिल्मी सीन! घटस्फोटाच्या सुनावणीपूर्वीच कोर्टाबाहेर नवरा-बायकोचं पुनर्मिलन, एकमेकांना मिठी मारली अन्... घटनेचा Video चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाला अचानक वेगळे वळण मिळाल्याची चर्चा.
  • कठीण परिस्थितीत घेतलेल्या एका निर्णयामुळे नात्याबाबतचा दृष्टिकोन बदलल्याचे सांगितले जात आहे.
  • कोर्टाबाहेर घडलेला भावनिक प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मागील काही काळापासून घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. लहान-सहान कारणावरुन जोडपे टोकाचा निर्णय घेतात आणि मग पुढे जाऊन याच निर्णयाचा त्यांना पश्चाताप होऊ लागतो. लग्नाचं नातं हे फक्त प्रेमाने भरलेलं नसतं तर यात विश्वास, आदर या गोष्टींनाही तितकेच महत्त्व द्यावे लागते अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर अलिकडे एक भावनिक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात कोर्टाबाहेर नवरा-बायकोचं पॅच-अप झाल्याचं दिसून आलं. दोघांमधील प्रेम आणि नातं तुटण्याआधी दाखवलेला सामंज्यसपणा पाहून यूजर्स खुश झाले असून इंटरनेटवर व्हिडिओला चांगलेच शेअर केला जात आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

BJP मध्ये सामील व्हायला गेला TMC नेता, हिरवा गुलाल लावतंच नेत्याची करण्यात आली हकालपट्टी; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

एखाद्या चित्रपटासारखी वाटणारी ही घटना शिखा सिंह आणि तिचा पती साैरभ याच्यासोबत घडून आली. रिपोर्ट्सनुसार, पती-पत्नी दोघांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद सुरु झाला ज्यानंतर शिखाने हुंड्याचा खोटा खटला दाखल करत पती साैरभकडे घटस्फोटाची मागणी केली. हा खटला केवळ एक-दोन दिवस नव्हे, तर पाच वर्षे चालला. या पाच वर्षांच्या कायदेशीर लढाईत शिखाच्या वडिलांची आयुष्यभराची सर्व बचत संपली. आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे शिखाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला ज्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर होती.

पतीने दाखवला मोठेपणा

शिखाचे वडिल सरकारी रुग्णालयात गंभीर परिस्थितीत आहे याची माहिती मिळताच पती साैरभने सर्व वैर बाजूला सारले आणि तो लगेच रुग्णालयात गेला. आपल्या सासऱ्यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी साैरभने सरकारी रुग्णालयातून त्यांना प्रायव्हेट हाॅस्पिटलमध्ये भरली केले. त्यांचा उपचाराच्या खर्चाची जबाबदारी देखील साैरभने उचलली.

या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कोर्टात साैरभ आणि शिखाच्या घटस्फोटाची सुनावणी होती. परंतु आपल्या वडिलांसाठी पतीने उचलले हे पाऊल पाहून शिखाच्या मनातून पतीबाबतचा कडवटपणा संपुष्टात आला होता. काही सेकंदाच्या या व्हिडिओत नवरा-बायको कोर्टाबाहेर दोघांना घट्ट मिठी मारत घटस्फोटाचा निर्णय मागे घेताना दिसून येतात. दोघांमधील हे भावनिक क्षण तिथे उपस्थित एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले ज्यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला.

Shikha Singh had a fight with her husband and got a fake dowry case filed against him, and then started demanding a divorce. For 5 years, the case dragged on, and the girl’s father’s entire savings were exhausted. When he suffered a heart attack, due to lack of money, he had to… pic.twitter.com/44MzMcLsJD — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 12, 2026

ताई तर धुरंधर निघाल्या! लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी आवाक्

व्हिडिओला @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले असून यूजर्सने या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “हा माणूस पुन्हा अशी चूक करत आहे, ज्याबद्दल त्याला आयुष्यात नंतर पश्चात्ताप होईल. हा केवळ परिस्थितीमुळे झालेला समेट आहे, जो काळानुसार ओसरून जाईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकालच्या भारतीय महिलांना ‘देवी’ म्हणू नये. त्या तर ‘शूर्पणखा’ आहेत; त्यांना फक्त पैशाचाच लोभ असतो…” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तिने प्रेमापोटी ती कागदपत्रे फाडली नाहीत, तर केवळ हतबलतेमुळे तसे केले; कारण तिच्या वडिलांना पैशांची गरज होती. जर ते आजारी पडले नसते, तर सौरभ अजूनही कोर्टाच्या फेऱ्या घालत बसला असता”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Husband wife reunion before divorce hearing court video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Divorce
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

BJP मध्ये सामील व्हायला गेला TMC नेता, हिरवा गुलाल लावतंच नेत्याची करण्यात आली हकालपट्टी; Video Viral
1

BJP मध्ये सामील व्हायला गेला TMC नेता, हिरवा गुलाल लावतंच नेत्याची करण्यात आली हकालपट्टी; Video Viral

ताई तर धुरंधर निघाल्या! लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी आवाक्
2

ताई तर धुरंधर निघाल्या! लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी आवाक्

लंगड्याचं सोंग पडलं भारी! कुत्रे मागे लागताच भरधाव धावत सुटला भिकारी; नेटकऱ्यांनी घेतली मज्जा, Video Viral
3

लंगड्याचं सोंग पडलं भारी! कुत्रे मागे लागताच भरधाव धावत सुटला भिकारी; नेटकऱ्यांनी घेतली मज्जा, Video Viral

लोकांच्या आरोग्याशी खेळ! हिरव्या रंगात बुडवून विकली जातेय काकडी? भाजीवाल्याचा कारनामा येईल संताप, Video Viral
4

लोकांच्या आरोग्याशी खेळ! हिरव्या रंगात बुडवून विकली जातेय काकडी? भाजीवाल्याचा कारनामा येईल संताप, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.