
फोटो सौजन्य सोशल मिडिया
मल्हारने हा व्हिडिओ @malhar_31 या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला असून मल्हारने सांगितले की, जेव्हा त्याने पाहिले की 1एसीचे भाडे जवळपास विमानाच्या तिकिटा एवढेच आहे. तेव्हा त्याला वाटले की प्रीमियम राजधानीच्या अनुभवाचा आनंद का घेऊ नये. ही ट्रेन मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली अशी अंदाजे 1384 किलोमीटरचे अंतर सुमारे 15 तास आणि 32 मिनिटांत पार करते. तिचा कमाल वेग ताशी 130 किलोमीटर एवढा आहे. मल्हारने 1एसी कोचमधून प्रवास केला, ज्यात खाजगी कोचसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
या व्हिडिओमध्ये, मल्हारने ट्रेनच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती दिली.ट्रेन मध्ये मिळणारी स्वच्छ बेडशीट, उशा, वर्तमानपत्रे आणि आरसे यांसारख्या मूलभूत सुविधा, तसेच जेवण आणि पेये तिकिटात समाविष्ट होती.रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता आणि चहा-कॉफी यांसारख्या उत्तम सेवा उपलब्ध होत्या.
त्याने ट्रेनच्या डब्याच्या स्वच्छतेची, कर्मचाऱ्यांच्या वागणुकीची आणि आरामदायक प्रवासाची प्रशंसा केली. त्याने खिडकीतून दिसणाऱ्या निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेतल्याचाही उल्लेख देखील केला.
व्लॉगरने स्पष्टपणे सांगितले की विमानाला 2-2.5 तास लागतात, पण ट्रेनचा अनुभव वेगळाच असतो. तुमच्याकडे जास्त वेळ असल्यास, तुम्ही राजधानीच्या १एसी (1AC) मधून नक्कीच प्रवास करायला हवा.
Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा
त्याचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला. अनेक वापरकर्त्यांनी ट्रेनच्या सुविधांची प्रशंसा केली, तर काहींनी गंमतीने टिप्पणी केली, “भावा, एवढ्या पैशात मी विमानाने प्रवास करू शकलो असतो!” तथापि, बहुतेक लोकांनी भारतीय रेल्वेच्या प्रीमियम सेवांचे कौतुक केले. तेजस राजधानी ही मुंबई-दिल्ली मार्गावरील सर्वात वेगवान आणि सर्वात प्रीमियम ट्रेनपैकी एक मानली जाते. 1एसी (1AC) प्रवाशांना अधिक गोपनीयता, उत्तम जेवण आणि आराम देते. मल्हारच्या अनुभवावरून हे दिसून येते की केवळ वेगच महत्त्वाचा नसतो, तर प्रवासातील आनंदही महत्त्वाचा असतो. भाडे जवळपास सारखेच असल्याने, अनेक लोक आता रेल्वेला एक व्यवहार्य पर्याय मानत आहेत.