Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुष्पा आणि चंदा हत्तिणीने शाही अंदाजात केले अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचे स्वागत, अनोखा अंदाज सर्वच भारावले; Video Viral

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि त्यांच्या कुटुंबाचे जयपूरच्या आमेर किल्ल्यावर भव्य स्वागत करण्यात आले. यातील दोन हत्तिणींचे स्वागत सध्या सर्वांचे हृदय जिंकत आहे, याचा एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 22, 2025 | 01:06 PM
पुष्पा आणि चंदा हत्तिणीने शाही अंदाजात केले अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे स्वागत, अनोखा अंदाज सर्वच भारावले; Video Viral

पुष्पा आणि चंदा हत्तिणीने शाही अंदाजात केले अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे स्वागत, अनोखा अंदाज सर्वच भारावले; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांचा भारत दौरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या पत्नी उषा व्हान्स आणि त्यांच्या तीन मुलांसोबत ते सोमवारी जयपूरच्या सांस्कृतिक दौऱ्यावर गेले. या दौऱ्याची सुरुवात झाली ती जयपूरपासून सुमारे ११ किमी अंतरावर वसलेल्या ऐतिहासिक आणि भव्य आमेर किल्ल्यापासून, जो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक मानला जातो. अरावली पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला त्याच्या राजेशाही भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे.

Hippopotamus VS Crocodile: पाण्याचे दोन शिकारी भिडले आमने-सामने, शिकाऱ्यांच्या युद्धात कोणी मारली बाजी? Video Viral

किल्ल्यावर त्यांचे आगमन होताच व्हान्स कुटुंबाचे पारंपरिक राजस्थानी पद्धतीने स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी पोशाखातील लोककलावंतांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य आणि संगीत सादर केले. मात्र या स्वागत समारंभातील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे हत्तिणी चंदा आणि पुष्पा. दोन्ही हत्तिणींनी राजेशाही पद्धतीने सलामी देत त्यांचे स्वागत केले. हे दोन्ही हत्ती खास अंबरजवळील ‘हाथी गाव’ येथे प्रशिक्षित करण्यात आले होते. जेडी व्हान्स आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा अनुभव नक्कीच संस्मरणीय ठरला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघण्यासारखे होते.

#WATCH | Rajasthan: Vice President of the United States, JD Vance, along with Second Lady Usha Vance and their children at Jaipur’s Amber Fort. pic.twitter.com/COCRhmzizo — ANI (@ANI) April 22, 2025

व्हान्स कुटुंबाने किल्ल्याच्या सुंदर वास्तुरचनेचा आणि त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाचा सखोल अभ्यास केला. फिकट पिवळ्या आणि गुलाबी वाळूच्या दगडांपासून बांधलेला हा किल्ला पांढऱ्या संगमरवरी सजावटीने नटलेला असून, त्यातील जडजवाहीरासारखी झळाळणारी झांकी पर्यटकांना भुरळ घालते. व्हान्स यांच्या भेटीदरम्यान, हा किल्ला सामान्य पर्यटकांसाठी २४ तास बंद ठेवण्यात आला होता, ज्यामुळे त्यांना शांततेत दौरा करता आला. जयपूरमधील त्यांच्या निवासासाठी रामबाग पॅलेस निवडण्यात आला, जो भारतातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक हेरिटेज हॉटेल्सपैकी एक मानला जातो. येथे अनेक जागतिक नेते आणि सेलिब्रिटींचे आदरातिथ्य करण्यात आले आहे. जयपूरमधील त्यांच्या एक दिवसाच्या थांब्यादरम्यान, ते हवा महल, जंतरमंतर आणि सिटी पॅलेस यासारख्या प्रसिद्ध स्थळांना आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे.

यारी हो तो ऐसी! लाहोर कलंदर्सने कॅप्टन शाहीन आफ्रिदीला गिफ्ट केला 24 कॅरेट सोन्याचा iPhone 16 Pro; Video Viral

किल्ला दौऱ्यानंतर, व्हान्स राजस्थान इंटरनॅशनल सेंटरमध्ये (RIC) ‘भारत-अमेरिका संबंध’ या विषयावर व्याख्यान देतील. या व्याख्यानाला वरिष्ठ भारतीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, राजनयिक आणि धोरण तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. या चर्चेचा केंद्रबिंदू संरक्षण, ऊर्जा सहकार्य, आणि आघाडीच्या तंत्रज्ञानातील भागीदारी यावर असेल. जयपूरनंतर, व्हान्स कुटुंब आग्रा येथे ताजमहाल आणि इतर ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहे. त्यानंतर २४ एप्रिल रोजी पहाटे ते अमेरिकेच्या दिशेने परत जातील. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आलेला हा दौरा अनेक पातळ्यांवर महत्त्वाचा मानला जात आहे, विशेषतः संरक्षण, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांच्या सहकार्याच्या वाढीस गती देण्याच्या दृष्टीने याकडे विशेष करून पाहिले जात आहे.

Web Title: In a royal style elephant pushpa and chanda welcomes us vice president everyone was impressed by their unique style video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • Elephant Video
  • Jaipur
  • US President
  • viral video

संबंधित बातम्या

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral
1

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video
2

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
3

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral

एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral
4

एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.