(फोटो सौजन्य – X)
जंगलाचा राजा सिंह असला तरी, जेव्हा पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा दोन प्राण्यांची नावे सर्वात आधी ज्यांचा विचार येति ते म्हणजे, पाणघोडे आणि मगर. हे दोघेही अत्यंत धोकादायक आणि आक्रमक शिकारी आहेत. दोघांच्याही तावडीत सापडलेला शिकार क्वचितच वाचतो. तुम्ही आजवर यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील मात्र तुम्ही दोघांना आमने-सामने भिडताना कधी पाहिले आहे का? सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्हीही प्राणी एकमेकांना झुंज देताना दिसून आले. हे दृश्य फारच मनोरंजक होते आणि वाऱ्याच्या वेगाने ते इंटरनेटवर व्हायरल झाले. या लढतीत नक्की कुणी विजय मिळवला आणि कुणी आपली हार स्वीकारली चला ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
मगर आणि पाणघोडे दोघांचेही जबडे खूप मजबूत आणि धोकादायक असतात, जे क्षणार्धात कोणताही शिकार गिळू शकतात. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये या दोन प्राण्यांमधील एक छोटीशी पण रोमांचक लढाई दिसून येते, जी लोकांना आश्चर्यचकित करते. व्हिडिओमध्ये एक पाणघोडा पाण्यातून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. यावेळी तिथे आधीच उपस्थित असलेला एक मगर त्याच्याकडे पाहतो. काही क्षणातच दोघेही समोरासमोर येतात आणि त्यांच्या जबड्यांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात.
व्हिडिओमध्ये पुढे दिसून येते की, दोन्ही प्राणी एकमेकांवर हल्ला करतात तेव्हा पाणघोडा अधिक शक्तिशाली दिसतो आणि मगरीवर मात करतो. हे सर्व पाहून, मगर लगेच मागे हटते आणि पळून जाऊ लागते, त्यानंतर ही कथा इथेच संपते. आम्ही तुम्हाला सांगतो की पाणघोड्याचा जबडा खूप मजबूत आणि प्रचंड असतो. त्याच्या तोंडातील तीक्ष्ण दात त्याच्या भक्ष्याला फाडून टाकतात. या दोन धोकादायक प्राण्यांमधील संघर्षाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वादळासारखा व्हायरल होत आहे आणि लोक तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत.
Everyone recognizes a psycho when they see one pic.twitter.com/DpkR9zBCMr
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) April 20, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 15 मिलियनहून अधिक युजर्सने पाहिले आहे तर अनेकांनी याच्या कमेंट्समध्ये व्हिडिओवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “त्या दोघांमधील सर्वात धोकादायक कोण आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हिप्पो हा प्राण्यांच्या जगातला खरा राजा आहे, कोणीही त्याच्या वाटेला जात नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही