
bride's two teeth are broken before the Marriage
अशीच एक प्रथा चीनमधील एका जमातीमध्ये पाळली जाते. या प्रथेमध्ये लग्नापूर्वी वधूचे दोन दात तोडले जातात. हे वाचून तुम्हाला हसू आले असेल. पण यामागचे कारणही तितकेच भयावह आणि विचित्र आहे. सहसा लग्नामध्ये वधू सर्वात सुंदर दिसावी यासाठी तिला मेकअपने, विविध दाग्यांनी, छान अशा वस्त्रांनी सजवले जाते. मात्र चीनमधील गेलाओ जमातीमध्ये एक विचित्र परंपरा आहे. या जमातीमध्ये लग्नाआधी वधूचे पुढचे दोन दात तोडले जातात. या मागे एक विचित्र पंरपरा आहे. ज्याबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल.
गेलाओ जमातीच्या मान्यतानुसार, वधूचे दात तुटले नाहीत, परंपरेचे पालन करण्यात आले नाही तर नवराच्या कुटुंबावर अनिश्चित आणि भयंकर संकट येऊ शकते. यासाठी होणाऱ्या जोडीदारावर आणि आपल्या घरावर कोणताही काळ येऊ नये यामुळे वधूचे पुढचे दोन दात तोडले जातात. अशा वेळी दातांचे संरक्षण करण्यासाठी कुत्र्यांचे दात त्याजागी बसवले जातात.
गेलाओ जमातीत ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरु आहे. महिला २० वर्षाची झाली की तिच्या लग्नाची तयापी सुरु होते. यावेळी तिचे पुढेचे दोन दात काढले जातात. जमातीच्या मान्यतेनुसार, महिलेच्या या कृतीला शौर्याचे आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते.
माहितीनुसार, पहिल्यांदा एका भांड्यात वाइन घेतली जाते. यानंतर मुलीच्या मामाला आदराने आमंत्रित करातात. एका लहान हातोड्याने मुलीचे मामा तिचे दात काढतात. जर मामाचे निधन झाले असेल घरातील इतर वडीलधाऱ्या पुरुषापैकी कोणीही ही विधी करतात. या प्रथेचे पालन न केल्यास संबंधित महिलेला समाजात टिकांचा, उपहासाचा सामना करावा लागतो.
गेलाओ जमात ही चीन आणि व्हिएतनामध्ये आढळते. या जामतीचा समुदाया बहुतांश दक्षिण चीनच्या गुइझोऊ प्रांताच पश्चिम भागात राहतो. हे लोक पारंपारिकपणे शेतीवर अवलंबून असतात. भाताची लागवड या जमातीच्या लोकांकडून डोंगराळ आणि कोरड्या भागात केली जाते.
टीप – हे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.